नवीन लेखन...

जेष्ठ व्हायोलिन वादक पं.डी.के.दातार

जेष्ठ व्हायोलिन वादक पं.डी.के.दातार यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला. पं. डी.के.दातार यांची व्हायोलिनची वादनशैली गायकी अंगाची म्हणजे गायनाशी नातं आणि इमान राखणारी आहे. खरेतर पंडितजींचे घराणे गायकाचे. त्यांचे वडील केशवराव आणि गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर हे गुरुबंधु. त्यामुळे पंडितजींकडे गायनाचा वारसा परंपरेने आलाच होता. मात्र पंडितजी अवघे सहा वर्षांचे असतानाच केशवरावांचे निधन झाले.

परिणामी, त्यांच्याकडून गाण्याची संथा मिळालीच नाही. तरीही वडीलबंधु नारायणराव आणि मामा दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांनी पंडितजींवर लहानपणी गाण्याचे उत्तम संस्कार केले. या संस्कारांमुळेच पंडितजींनी लहानपणी गाण्यात उत्तम तयारी दाखवलीही. पण त्यांचे भाह्याच काही वेगळेच होते. ते गाण्यात रमलेले असतानाच एक दिवस नारायणरावांनी त्यांच्या हातात व्हायोलिन दिले. गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून पंडितजींनी व्हायोलिन शिकायला सुरूवात केली.

१९४३ मध्ये ते देवधर मास्तरांच्या ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ मध्ये दाखल झाले. तिथे पंडित विघ्नेश्वरशास्त्री यांच्यासारखे व्हायोलिनवर कमालीचं प्रभुत्व असलेले गुरू त्यांना लाभले. विघ्नेश्वरशास्त्रींनी आपली सारी कला या प्रज्ञावंत शिष्याच्या झोळीत टाकली. मात्र पं. दातार यांनीही मिळालेले दान अंधपणाने स्वीकारले नाही. आपल्या प्रतिभेने त्यांनी ते अधिक झळझळीत केले. वास्तविक पं. दातार व्हायोलिन शिकत होते, तेव्हा श्रीधर पार्सेकर, गजाननबुवा जोशी यांनी व्हायोलिन वादनात चांगलेच नाव कमावले होते. परंतु तो पर्यंत व्हायोलिन हे फक्त वाद्याच्या अंगानेच वाजवले जायचे. परंतु डी. के. दातार गायन शिकलेले असल्यामुळे त्यांनी ते गायकीच्या अंगाने वाजवायला सुरुवात केली. त्यामुळेच त्यांचे व्हायोलिनवादन ऐकताना आपण गायनाची एखादी मेहफील ऐकत आहोत, असाच भास होतो.

पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हायोलिन वादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले. पं. डी.के.दातार यांनी निघ्नेश्वर शास्त्री पंडितांकडे व्हायोलिन वादनाचे धडे गिरविले. पं. दातार यांनी डी. व्ही. पलुस्कर यांना अनेक कार्यक्रमांमधून संगतही केली. पं. दातार यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमीचा सन्मानही मिळाला आहे. संगीत रिसर्च अकादमी आणि कुमार गंधर्व फाऊण्डेशन यांनीही पं. दातार यांचा गौरव केला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..