नवीन लेखन...

पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर

पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. त्यांचा जन्म २८ मे १९२१ रोजी झाला. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या आईचे नाव रमाबाई, आणि पत्नी्चे उषाताई. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचा जन्म मे १९२१ रोजी नाशिक मध्ये झाला . दहा वर्षाचे असताना त्यांच्या पित्याचे निधन झाले.बी पटवर्धन आणि पंडित जवाहरलाल,विनायकराव पटवर्धन, नारायण व्यास हि मंडळी तेव्हा पलुस्करांच्या वडिलांना ओळखत होती. पलुस्कर त्यांच्या वडील कडून संगीताचे बाळकडू घेत होते परंतु त्यांच्या निधनानंतर या थोर व्यक्ती कडून संगीताचे धडे गिरवले . म्हणजे त्यांच्या वडिलांनंतर हेच पलुस्करांचे गुरु होते. पलुस्कर १४ वर्षाचे असताना पंजाब मध्ये संगीत परिषद भरली होती.

संगीताचा वारसा लाभलेले ग्वालेर येथील गंधर्व महाविद्यालयातून पदार्पण करण्याची जबाबदारी पलुस्करांना प्रथम मिळाली. यानंतर त्यांची संगीत कारकिर्दीची सुरवात हि ग्वाल्हेर घराण्यातच झाली. तसेच ग्वालेर घराण्यातूनच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आत्मसात केले. अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती.

पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचे निधन २५ ऑक्टोबर १९५५ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..