निवृत्तीबुवा सरनाईक जयपूर-अत्रौली घराण्याचे मराठी गायक होते. त्यांचा जन्म ४ जुलै १९१२ रोजी झाला. निवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व सवाई गंधर्व यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक अल्लादिया खान साहेब यांचा होता. पुढे त्यांनी त्याच शैलीत आपले गायन विकसित केले. बुवांनी आपल्या कसदार गायनाने अनेक मैफिली गाजवल्या व अनेक मानाचे समजले जाणारे पुरस्कार प्राप्त केले. ते कोल्हापूर संस्थानाचे दरबार-गायक होते. १९७० चे दरम्यान ते मुंबई विद्यापीठात संगीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९७८ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत निवासी संगीत गुरू म्हणून काम बघण्यास सुरुवात केली. १६ फेब्रुवारी १९९४ रोजी निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply