प्रतिष्ठीत संगीतकार, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विद्वान आणि शिक्षक पं. रामाश्रेय झा यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. पं रामाश्रेय झा यांनी लिहिलेल्या पाच खंड असलेल्या लेखांचा संग्रह अभिनव गीतांजली संगीत हे भारतीय संगीतातील एक महत्वाचे मानले जाते. यात रागांचे सखोल विश्लेषण केले आहे.
जितेंद्र अभिषेकी यांनी मा. पं रामाश्रेय झा यांच्या अनेक रचना गाऊन रसिकांसमोर आणल्या होत्या. १९६८ मध्ये, ते अलाहाबाद विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते आणि १९८० पर्यंत संगीत विभाग प्रमुख झाले होते. त्याचे सुप्रसिद्ध शिष्य गणांमध्ये मा.कमला बोस,मा. शुभा मुदगल, गीता बॅनर्जी अशी नावे आहेत. २००५ मध्ये पं रामाश्रेय झा यांना संगीत नाटक अकादमी, पुरस्कार मिळाला होता पं रामाश्रेय झा यांचे १ जानेवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट