नवीन लेखन...

ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित उल्हास कशाळकर

पंडित उल्हास कशाळकर यांचे शिक्षण M.A.(L.L MUSIC). त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी येथे झाला.कशाळकरांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे झाले. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या त्याच्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडून मिळाले. नागेश कशाळकर हे उल्हास लहान असताना त्यांना ग्रामोफोनवर वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्याक भीमपलास, यमन, शुद्ध कल्या ण या रागांच्यार बंदिशी एकवत असत. त्याेचे संस्कार उल्हास कशाळकर यांच्याुवर होत असत. त्यांच्या वडिलांनी वेगवेगळ्या नावाजलेल्याा गायकांच्या गाण्यांशी उल्हास यांची ओळख करून दिली. सोबत त्या पैकी कुणाकडून कोणता गुण आत्मासात करावा याचे स्वातंत्र्यही दिले. मा.उल्हास कशाळकर यांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताच्या अभ्यासास सुरुवात केली. उल्हाास कशाळकर यांना ‘बालगंधर्व नाट्यसंगीत स्पसर्धे’त भरघोस यश मिळाले. त्यामुळे त्यांचे नाव ज्याच्या त्याच्यां तोंडी झाले. हा मुलगा नाट्यसंगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करेल असे भाकित अनेकांनी वर्तवले. कशाळकर यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्याकनंतर त्यांची राम मराठे यांच्यांकडे आग्रा घराण्या ची तालिम सुरू झाली. राम मराठे हे उत्तम ख्यामल गायक होते. कशाळकर यांनी त्यांच्याकडे विशेष करून ख्याल गायकीचे धडे घेतले. त्या नंतर त्यांनी गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळवली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे. उल्हास कशाळकरांनी दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी १९८३ ते १९९० च्या दरम्यान काम केले. त्यांनी १९९३ मध्ये कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत आचार्यपद स्वीकारले. ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्यांची ग्वाल्हेर घराण्यासोबत आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकूमत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत ही महाराष्ट्राला अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी राम देशपांडे, ओंकार दादरकर व शशांक मकतेदार असे शिष्य घडवले आहेत. मा.कशाळकर यांना २०१० साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा.उल्हास कशाळकर यांना पाच भाऊ असून सगळे गायक आहेत. त्यामपैकी अरूण हे आग्रा घराण्या्चे सुप्रसिद्ध गायक आहेत, तर विकास हे संगीततज्ञ आहेत. कशाळकरांच्यार पत्नी संजिवनी कोलकाता आकाशवाणीत असिस्टंट स्टेशन डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. संमिहन कशाळकर हा मुलगा. तो वडिलांकडेच गाणे शिकत असून कोलकात्याला एस.आर.ए.मध्येू शिष्यवृत्ती धारक आहे. मा.उल्हास कशाळकर अखिल भारतीय पातळीवरील ‘क्रिटिक असोसिएशन’च्या मानाच्या पुरस्काराने गौरवले गेले आहेत. त्यां ना संगीत नाटक अकादमी पुरस्कार २००८ साली प्राप्ता झाला होता. त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून, ते ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात २००६ मध्ये, तर अॅमस्टरडॅम – भारत महोत्सवात २००८ मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. मा.सुरेश तळवलकरांच्या तबलासाथीचे व उल्हास यांच्या गाण्याचे अद्वैत आहे. उल्हास याच्या गाण्याच्या प्रवासात तळवलकरांचा सहभाग मोठाच. सुरेश तळवलकर म्हणतात,“काही वर्षांपूर्वी उल्हासचे गाणे ऐकून लोक वाहवा म्हणायचे. आता आहाहा म्हणतात. दोन शब्दांतील फरक रसिकांना ठाऊक आहे. भारतीय अभिजात संगीत काळाबरोबर झेपावले आहे आणि कशाळकर हे त्याचेच निदर्शक आहेत.”

उल्हास कशाळकर यांची वेबसाईट www.ulhaskashalkar.com

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. थिंक महाराष्ट्र / मकरंद वैशंपायन

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..