विजय घाटे यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरवात केली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६४ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १२ व्या वर्षी त्यांनी तबलामधील विशारद पदवी मिळविली होती. वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि बारा वर्षांहून अधिक काळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या कडे गुरुकुल पध्दतीत शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षीही ते आपल्या चमकदार एकल म्हणजेच सोलो तबला वादनाने प्रसिद्ध झाले. विजय घाटे हे काही कलाकांरपैकी एक आहे जे गायन, वाद्य आणि नृत्य या तीनमध्ये निपुण आहेत.
विजय घाटे यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान, उस्ताद विलायत खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद शाहिद परवेझ आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या सोबत साथ केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार प्रसिद्ध संगीत जेथ्रॉटेल सारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत आणि जॉर्ज ड्यूकेस, अल्जेर्यु, रवी कॉलतारिन यांच्या सारख्यांना साथ दिली आहे. तसेच विजय घाटे यांनी गिसॉन्टी, लॅरी कॉरीयेल, जॉर्ज ब्रुक्स इ. त्यांनी लुई बॅंक, शंकर महादेवन, हरिहरन, शिवमणी या सुप्रसिद्ध भारतीय संगीतकारांसोबत काम केले आहे. विजय घाटे यांनी कर्नाटकी फ्युजन मध्ये डॉ. सुब्रायमॅनियम, विद्याभवन विनायकम, एम.एस गोपालकृष्णन व यू. श्रीनिवास यांच्या बरोबरही काम केले आहे. विजय घाटे नेदेरलंड मधील रॉटरडॅम मधील आर्ट कॉट्स युनीव्हसीटीत व्हिजीटींग फॅकल्टी म्हणून काम करतात.
विजय घाटे यांनी पॅरिस येथे १९८४ साली भारत-फ्रांस फेस्टिव्हल, १९८५ साली भारत फेस्टिव्हल रशिया येथे, राष्ट्रपती भवन येथे आणि भारत भवन येथे भारतीय महोत्सव येथे आपल्या तबला वादनाची प्रतीभा दाखवली होती. ते सवाई गंधर्व संगीत महोत्सव, हरवलाभा संगीत महोत्सव, तानसेन समारोह, गुनीदास संमेलन, उस्ताद अखिलिया खान संगीत समारोह, कालिदास महोत्सव, खजुराहो महोत्सव, विष्णु दिगंबर संगीत उत्सव महोत्सवामध्ये आपले उत्कृष्ट तबला वादन प्रदर्शित करत असतात. विजय घाटे यांनी तालचक्र नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला असून तो तरुण आणि नवीन कलाकारांसाठी व्यासपीठ पुरवते आणि आर्थिक दुर्बल घटकांमध्ये संगीतकारांना मदत करते. या ट्रस्टने अनुभवी संगीतकारांकडून संगीत कार्यशाळा आयोजित करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वातावरणात असलेल्या संगीतकार व संगीत शिक्षकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची योजना आखली आहे. तालाचक ट्रस्ट शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांना प्रोत्साहित करतो.
विजय घाटे यांनी ‘विजय’ नावाचा आपला अल्बम प्रसिद्ध केला आहे. विजय घाटे यांना पं. जसराज पुरस्कार, सरस्वती बाई राणे पुरस्कार, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांचा २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply