पाण्यात सोडल्यावर,
पिल्लू कसे पळाले,
भय भीती ना डर,
लाटांशी खेळत निघाले,—!!!
समुद्री उठे लाट,
अलगद पायात येते,
तिलाच खेळणे समजून,
पिल्लू नाचत राहते,—–!!!
क्षणभर बावरून,
एकदा वळून बघते,
टाकत पुढे आपले पाय,
घराकडे कसे निघते,—!!!
फेसाळत आता समोर,
समुद्र स्वागत करे,
जणू लेकरू बघून,
आनंद गगनी न मावे,—!!!
तो असीम अथांग, अपार, पिल्लाला धाशत नसे,
कडेखांदी सागराच्या,
मस्तीत कसे ते खेळे,–!!!
शिकवतो जणू निसर्ग,
मानवा घे तू धडे,
एकलेपणाचे कसले भय,
पिल्लू तर बघ केवढे,—!!!
अमर्याद त्या सागरास,
जर ते सहज तोंड देते,
संकटे येता समोर,–
माणूसपण का खचून जाते,-?-!!!
जरी असली ती अक्राळ, त्यावरती जिद्द मांत करे,
शक्य ते अशक्यकोटीतील,
छोटेही मग पुरून उरे,–!!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply