वेगाने तो जात असता, घटना एक घडली ।
तुडवले गेले जीव जंतू , त्याच्या पाययदळी ।।
ज्ञात नव्हते कांहीं त्याला, त्याच्या कृत्याचे ।
स्वकर्मा मध्ये गुंतले होते, एक चित्त त्याचे ।।
नजर गेली अवचित त्याची, एका सरड्यावरती ।
दगड मारूनी बळी घेतला, असूनी अंतरावरी ।।
पापाचा बने भागीदार, मारूनी सरड्याला ।
अकारण कृत्य जे केले, पात्र ठरे शिक्षेला ।।
अगणित जिवाणू जेंव्हां मेले, कृत्य नव्हते त्याचे ।
जाणतेपणातील कर्म आणिते, हिशोब पाप पुण्ण्याचे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply