द्वारकानाथ सदानंद संझगिरी म्हणजे पप्पू . पप्पू हे त्यांचे असे टोपणनाव आहे की ते सगळ्यांना सांगतात मला साहेब किंवा तत्सम उपाधी लावू नका. कारण पप्पू या शब्दाने माणसे सहज जोडता येतात तशी संझगिरी यांनी देश-विदेशात लकहो माणसे , मित्र जोडली आहेत म्हणून आपण त्यांना आता ह्या त्यांच्यावरील लेखात ‘ पप्पू ‘ म्हणूनच म्हणू. तुम्हाला मजेत नसेल परंतु त्यांच्या गळ्यात जे लॉकेट त्यामध्ये ‘ Pappu ‘ ही अक्षरे आहेत.त्यांचा जन्म १५ नोव्हेंबराचा परंतु साल मात्र मी सांगणार आणि कारण मालच माहित नाही. वर्ष कशाला मोजायची , आनंद कधी मोजता येतो का ? तसेच संझगिरींचे म्हणजे पप्पूचे आहे. त्यांचे लहानपण दादरच्या हिंदू कॉलनीत गेले त्यानंतर ते शिवाजी पार्क येथे रहाण्यास आले. दोन्ही ठिकाणे क्रिकेटसाठी पूरक होती त्यावेळी अनेक क्रिकेटपटू हिंदू कॉलनीमध्ये रहात होते. त्यावेळी तेथे चंदू पाटणकर , हिंदळेकर , दिलीप वेसरकार , वासू पर्णाजपे तेथे रहात ते दादर युनियन मधून खेळत असत . त्यावेळी संझगिरी त्यांच्या मावशीकडे हिंदू कॉलनीमध्ये रहात असत.
त्यांनी सिविल इंजिनीअरिंग व्ही. जे .टी. आय. कॉलेजमधून केले. परंतु इयत्ता सातवी पर्यंत ते अत्यंत सामान्य विद्यार्थी होते. परंतु आठवी , नववी, दहावी आणि ११ वी मध्ये मात्र त्यांनी कसून अभ्यास केला . त्यावेळी ते वर्गाचे मॉनिटर होते. त्यांचे वाचन अफाट होते आणि लहानपणी शिवाजी पार्क मध्ये त्यांनी अनेक भाषणे ऐकली त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झाला. त्याचप्रमाणे लहानपणी त्यांना एक मंदिरामधील भागात प्रवेश मिळाला नाही अशा अनेक प्रसंगामुळे ते नेहमी माणसाला माणूस म्हणून ओळखू लागले आणि त्याच्याशी मैत्री करून त्यांना आपले मित्र केले असे हजारो , लाखोजण देशात आणि प्रदेशात आहेत.
तुम्हाला माहित आहे त्यांनी लहानपणी कुणाकुणाची भाषणे ऐकली त्यांची नावे ऐकली तर आस्चर्य वाटेल तुमहाला त्यांनी आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे , बाळासाहेब ठाकरे , नाथ पै , एस. एम.जोशी यांची भाषणे ऐकली. खरेच मुलांनो आता प्रामाणिकपणे सांगा तुम्ही कधी आत्मचरित्रे वाचली आहेत का कुणाची , कुणा मोठ्या व्यक्तींची प्रत्यक्ष भाषणे ऐकली आहेत का ? फक्त अभ्यास करून चागले पास व्हाल , नोकरी चांगली लागेल , पैसे मिळतील परंतु समाजामध्ये नाव मिळेल का ? ते नाव मिळते ते तुम्ही उत्तम खेळत असाल , उत्तम गाणे म्हणत असाल किंवा उत्तम लिहू शकला तर निश्चित लेखपण व्हाल. अर्थात शिक्षण हे हवेच ह्या नियमाप्रमाणे संझगिरी खूप शिकले आणि त्यांनी त्यांच्या कामाच्या क्षेत्रातही नाव कमावले त्यापेक्षा जास्त नाव त्यांनी लेखक म्हणून , क्रिकेट समीक्षक म्हणून कमावले. आज तुम्ही त्यांना क्रिकेट मॅच असली कि मराठी चॅनेलवर नेहमी बघत असालच.
द्वारकानाथ संझगिरीं यांनी वयाच्या २१ व्या वर्षी लिहिण्यास सुरवात केली. त्यांचे वडील जाहिरात क्षेत्रात होते , त्यामुळे त्यांच्याकडे सर्व वृत्तपत्रे येत असत त्या वाचनामुळे समाजात काय चालले आहे ह्यांचे त्यांना भान होते आणि या सर्व गोष्टींमधून त्यांना लिहणायची स्फूर्ती मिळाली.ब्रॅडमन पासून भुवनेश्वरकुमार पर्यंतचे आणि त्यांतरचेही अनेक क्रिकेटपटू पाहिले. गाडी सचिन तेंडुलकरालाही लहानपणी खेळताना शिवाजी पार्कवर पाहिले.मुलांनो तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही वृत्तपत्र वाचता का ? अग्रलेख म्हणजे काय ? हे तुम्हाला माहीत आहे का ? जर तुम्हला कोणी प्रश्न विचारला तर उत्तर काय देणार. संझगिरी म्हणतात अभ्यास करावा लागतोच म्हणून केला कारण पस व्हायचे होते. परंतु या वयात मात्र आभासाव्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या सर्व आठवतात.परंतु आता खरेच केलेल्या अभ्यासामधले बरेच काही आठवत नाही. लहानपणी खूप खूप चित्रपट बघीतले कुठे तरी लहानपणी चित्रपट बघीतले , मोठ्या लोकांची भासाने ऐकली त्यामुळे आज मी लिहू शकतो. जर एखादी गोष्ट नाही समजली तर समोरचा माणूस कितीही लहान असला तरी त्याच्याकडून ती गोस्ट जाणून घेण्याची आजही उत्सुकता आहे.
क्रिकेटच्या क्षेत्रात समालोचक , अभ्यासक असल्यामुळे जगातील नामवंत क्रिकेटपटूची ओळख झाली , अनेक कार्यक्रम केले.आज तुम्ही त्या क्रिकेट पटूची यादी बघीतली तरी आपण हबकून जाऊ अगदी सर डॉन ब्रॅडमन पासून भुवनेश्वर कुमारपर्यंत आणि त्याही नत्राचे आतापर्यंतचे सर्व क्रिकेट पटू पाहिले , त्यांचॆशी बोलताही आले. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ह्यांना सुरवातीला खेळतानाही त्यांनी पाहिले.
तर मुलांनो स्वतः मोठे इंजिनीअर असून द्वारकानाथ संझगिरी हे नुसते नोकरी करत राहिले नाही तर त्यांनी चित्रपटांपासून क्रिकेटपर्यंत सर्व आवड जोपसली आणि ते देव आनंद पासून सचिन तेंडुलकर पर्यंत सर्वांवर कार्यक्रम त्यांनी केले. मोठमोठ्या क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतल्या. अगदी सर डॉन ब्रॅडमन याना त्यांच्या घरी जाऊन भेटले.
तर मुलांनो तुम्ही पण असेच मोठे बनणार ना ?
का नुसती नोकरी करणार , पैसे कमावणार ?
तर मुलांनो पैसे तर कमवाच परंतु त्याबरोबर नावही कमवा ,
जेणेकरून तुमची या जगात वेगळी ओळख निर्माण होईल.
लोक तुम्हाला टीव्ही वर बघतील …द्वारकानाथ संझगिरींसारखे .
आणि म्हणतीलही हा ना एकदम एक नंबर आहे !
— सतीश चाफेकर.
Leave a Reply