अटळ दान, जीवा मृत्यूचे
त्याला कधीच घाबरू नये
सात्विक, वात्सल्यामृताचे
कधीच विस्मरण होऊ नये
प्रीतभाव! उर्मी स्पंदनांना
त्याचा तिरस्कार करू नये
भोग भाळीच्या दुष्टचक्रांचे
भोगता, ईश्वरा विसरु नये
जन्ममरण! सत्य चराचराचे
असत्य! कधीच समजू नये
पराधिनता, हा जन्म मानवी
देह! अमर्त्य कधी समजू नये
विवेकी! सदा सत्कर्म करावे
आविचार, मनांतरी करू नये
स्मरावे! कृपावंती दयाघनाला
अश्रद्धा! त्यावर कधी ठेवू नये
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २७.
२७ – १ – २०२१.
Leave a Reply