काही कलाकार इतके प्रतिभावंत असतात की त्यांना कला साकारण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करुन घेता येतो. चित्रकला ही साधारणपणे कागदावर ब्रशने किंवा इतर माध्यमातून रंगरंगोटी करुन साकारली जाते. मात्र ब्रश किंवा रंगाचा वापर न करता एकाद्याने अप्रतिम चित्रे साकारली तर आपण काय म्हणाल?
जगावेगळा आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला मुळचा युक्रेनमध्ये जन्मलेला आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये वास्तव्याला असलेला चित्रकार मार्क खैसमन याने एक वेगळीच कला विकसित केली आहे. हा चित्रकार जे माध्यम वापरतो ते ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल. आपण पॅकिंगसाठी जी दोन इंच रुंदीची, खाकी रंगाची टेप वापरतो, तीच टेप म्हणजेच या मार्क खैसमनचं कलाकृती सदर करण्याचं मुख्य माध्यम. या टेपचेच लहान-मोठे तुकडे करुन, ते एकावर एक चिकटवून त्याने काही अफलातून पेंटिंग्ज तयार केली आहेत. ज्याप्रमाणे स्टेन्ड ग्लासमधून प्रकाश आरपार जातो आणि त्यातून त्रिमितीसारका इफेक्ट मिळतो तसाच इफेक्ट या चित्रांमधूनही मिळतो.
सोबतच्या चित्रातील ही खुर्ची पहा. ही कलाकृती स्पेनमधल्या एका चित्र संग्राहकाने तब्बल ८६,९८० डॉलर्स मोजून विकत घेतली.
या कलाप्रकाराला म्हणतात “पार्सल टेप आर्ट” या कलाप्रकाराविषयी अधिक जाणून घ्या http://www.khaismanstudio.com या वेबसाईटवर. इथे तुम्हाला पहायला मिळतील एकापेक्षा एक कलाकृती.
या मार्क खैसमनच्या कलाकृती दाखवणारा हा एक व्हिडिओसुद्धा बघा.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply