नवीन लेखन...

परी कथेतील राजकुमारी

आई तू माझ्या नावापुढे डॉ अनुराधा असे छान वाटते म्हणुन अनुराधा नाव ठेवले पण मी ते तुझे स्वप्न पूर्ण करू शकले नाही.

आज माझ्या एका एका मैत्रिणीने महिलादिनाच्या निमित्ताने स्त्रियांमध्ये कॅल्शिअम तपासणी चे शिबिर ठेवले होते त्यावेळी मला प्रमुख पाहुणे म्हणून तिने बोलावले ती माझ्यापेक्षा लहान आहे म्हणाली माझ्या खुर्चीवर तुम्ही बसा मी तुम्हाला माझा आदर्श मानते म्हणून तिच्या डॉक्टरचा खुर्चीवर बसले तेव्हा मला तुझी खुप आठवण झाली फोटो काढला आहे फक्त फोटो नाही तुझे हे मी स्वप्न पूर्ण करू शकते असे समज…

— सौ. अनुराधा ढवळेकर-कुलकर्णी.

ही आहे माझ्या परीकथेतील माझी मोठी मुलगी. मला ही पहिली मुलगी झाली होती. आणि नांव काय ठेवायचं असा विचार करत होते. आणि मला वाटलं की माझ डॉ व्हायच स्वप्न माझी लेक पूर्ण करेल म्हणून मी तिच्या नावाचा विचार करताना डॉ हे आधी शोभेल असे काही तरी ठेवावे. आणि डॉ अनुराधा खूपच छान वाटलं म्हणून तेच ठेवले…

पण कसं असतं ना माणूस ठरवतो एक आणि घडतं दुसरच. आणि तिच्या वेळी शिक्षण वगैरे याचा फारसा विचार केला जात नव्हता. तरीही मी पक्के केले होते की मी तिला डॉ. करेन. आणि ती हुशार आहे. एकपाठी आहे चिकाटी व जिद्द आहे म्हणून ती डॉक्टर नक्कीच होईल. पहिली ते दहावी पर्यंत तिने आपला पहिला क्रमांक सोडला नाही. बारावीच्या परीक्षात ही हेच होणार असा विश्वास होता. आणि पेपर देऊन आली की सांगायची आई मला आजच्या पेपर मध्ये इतके गुण मिळणारच. त्यामुळे मी निश्चित होते. परंतु अचानकच कळाले की शिक्षकांनी संप पुकारला आहे. आणि ते पेपर कुणीतरी तपासले होते. मूल्यमापन बरोबर झाले नाही. परिणामी अनेकांना झळ बसली. तिलाही प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे तिने जिथे प्रवेश घेतला तिथे चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली मी मात्र खूपच निराश झाले होते. प्रत्येक आईबाबांचे आपल्या मुलाबद्दल एक स्वप्न असते म्हणून नैराश्य येते…

शिक्षण घेत असताना तिने अनेक कला आत्मसात केल्या. आणि अजून बीएससीचा निकाल लागायचा होता. तोच एक स्थळ सांगून आले होते. आणि पुढे शिक्षण याबद्दल काही ठरवले नव्हते म्हणून. बघू या असे वाटून दाखवायचा कार्यक्रम झाला लगेचच होकार मिळाला मुलीने पण होकार दिला लग्न झाले थाटामाटात. पण शहर सोडून गावात. घरातील वातावरण वेगळेच. त्यामुळे मी स्वतःला दोषी समजत होते. पण तिने प्रत्येक वेळी धैर्याने तोंड दिले. अथक परिश्रम घेतले. प्रतिकूल परिस्थितीतही ती डगमगली नाही. आज ग्रामीण भागात एक मोठ्या नावाजलेल्या शाळेची ती संस्थापिका. मुख्याध्यापिका म्हणून ओळखली जाते. आणि महिलादिनाच्या निमित्ताने ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती तेंव्हा ती ज्या डॉ च्या खुर्चीवर बसलेली होती तो फोटो पाहून खूप आनंद व मनोमनी डॉ प्रणिता उत्तरवार यांचे आभार मानते कारण माझ्या परीकथेतील एक स्वप्न साकार झाले आहे असे मला वाटते म्हणून. ?

— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..