परीराणी एकदा उतरली तळ्यात
घसरून पाय पडली त्यात
हसू लागला कावळा
सोबत होता बगळा
बेडूक म्हणे! परीताई परीताई
“कसली गं एवढी घाई
कुठे जायचंय तुला
घेऊन चल ना मला
मी जातेच मावशी कडे
ती राहते नदी पलिकडे
यायचंय तर…. चल
पण आवाज करायचा नाही
मला त्रास द्यायचा नाही
दिलास तर परत आणायची नाही
म्हणून ‘बेडकाने मारली उडी
हो डुबूक डुबूक
नदी पलिकडे गेले
परीताई आणि बेडूक
मावशीकडे गेल्यावर बेडूक झाला पसार
पावसात भिजून त्याने नदी केली पार
झाडावरून झाडावर
मारल्या उड्या भराभरा
झोपाळ्यावर बसून
केला त्याने कहर
कसा त्याचा खेळ न्यारा
सारा दिनभर
भानावर आला थोडा
अंधार पडल्यावर
परीताई माझी वाट पहात असेल
मला सोडून ती गेली तर नसेल ?
परत आला मावशीकडे
शोधू लागला परीला
परीताई कधीच निघून
गेली आपल्या गावाला
परीताईची वाट बघत
बेडूक अजून बसलाय
तिला हाका मारून मारून
आवाज त्याचा बसलाय
म्हणून तर पावसामध्ये
बेडूक अजून रडतो
परीताईला जोरजोरात
हाका मारतो..
डरॅव-डरॅव-डरॅव
-सौरभ दिघे
Leave a Reply