MENU
नवीन लेखन...

परमेश्वराचे अस्तित्व

प्रत्येकाच्या मनात पुष्कळ वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की, परमेश्वर आहे का? तर तो सगूण आहे, की निर्गुण आहे, साकार आहे की निराकार आहे.

संत नामदेव यांचे वडील पांडुरंगाचे भक्त होते व नित्यनेमाने पांडुरंगाची पूजा करीत असत. एक दिवस त्यांना गावी जाण्याचा प्रसंग आला. त्यावेळी त्यांनी नामदेवाला सांगितले की, मी येई पर्यंत तू पांडुरंगाची पूजा कर व नैवैद्य दाखव असे सांगितले.पहिल्या दिवशी नामदेव यांन पांडुरंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला व विठ्ठलाने खाण्याची वाट पाहू लागला.पणविट्ठल काही नैवैद्य खाईना. तपासणी त्यांनी पांडुरंगास संगीतले की तू नैवैद्य खाल्ल्याशिवाय मी येथून घरी जाणार नाही. त्याचा दृढ निश्चय पाहून पांडुरंगाने नैवैद्य खाल्ला. घरी आल्यावर आईने विचारले उशीर का झाला. नामदेवांनी उत्तर दिले, पांडुरंग नैवैद्य खाई पर्यंत थांबलो.

आईचा विश्वास बसला नाही,वडील आल्यावर आईने ही गोष्ट वडिलांना सांगितली. वडील आल्यावर ते दोघेही नामदेवाच्य पाठोपाठ मंदिरात गेले. तेथे प्रत्यक्ष पांडुरंग नामदेवांच्या हस्ते नैवैद्य खातांना दिसले.

संत एकनाथमहाराज शंकाराचे मंदिरातध्यानस्थ बसले असतांना,देवगिरीयेथेजाऊन,जनार्दन स्वामी कडून गुरू मंत्र
घेण्याची प्रेरणा दिली.घरी न सांगता ते जनार्दन स्वामी कडे निघून गेले,त्यांची तेजस्वी मूर्ती पाहून शिष्य म्हणून जवळ
ठेऊन घेतले.जनार्दन स्वामी नेएकाजंगलात जाऊन,श्रीदत्तात्रेयाचे दर्शन घेतअसत.एक दिवस ते संत एकनाथ महाराजांना घेऊन जंगलात गेले व तेथे त्यांना श्री दत्तात्रेयाचे दर्शन दिले. एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचे दर्शनझाले व त्यांच्या पासून अनुग्रह मिळाला.

द्वारकेत मदनराय शर्मा नावाचा ब्राम्हण श्रीकृष्ण दर्शनाकरित तप करीत होता.रुक्मिणी मातेने त्याला स्वप्नात येऊन सांगितले की,भगवान पैठण येथे,एकनाथ महाराजांच्या घरी श्री खंड्याच्या रूपानेसेवा करीत आहेत.तू पैठण येथे जा. तो पैठण येथे आला व संतएकनाथ महाराजांना, म्हणाला,मला रुक्मिणी मातेने स्वप्नात येऊन सांगितले की,भगवान  श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपाने आपले कडे काम करीत आहेत. हे ऐकुन नाथांचे हृदय भरून आले.त्यांनी टाहो फोडला. ‘देवा,तू हे काय केलेस,धिक्कार असो माझा.मला अपराधाची क्षमा करा व दर्शन द्या.तसा तो,शंख,चक्र,गदा पद्मधारी शामसुंदर प्रकट झाला व त्यांना दर्शन दिले. या घटना कलियुगातील आहेत, परमेश्वराचे दर्शन घडू शकते हे सिद्ध होते.

आपल्या व्यवहारात आशा असंख्य गोष्टी आहेत की,आपण त्याचे अस्तित्व मानतो पण त्या दिसत नाहीत.पण त्यांचे कार्य वेगळ्या स्वरूपात पाहू शकतो. वीज दिसत नाही पण तीच अस्तित्व मानतो. प्रकाश देण्याचे,पंखा फिरविण्याचे,किंवा अन्य उपकरणा मध्ये कार्य दिसत.म्हणून आपण विजेचे अस्तित्व मान्य करतो.

तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे,”नाही आकार विकार । चराचर भरलेसे नव्हे सगुण निर्गुण जाणे कोण तयासी ।।

परमेश्वराला रूपही नाही नावही नाही. घडा करणाऱ्या कुंभराला आपण घडा पाहू शकतो. म्हणजे निर्मात्याला पाहू शकतो.कारण तो लहान आहे.प्रत्येक वस्तूचाकोणी तरी निर्माता असतो.सृष्टी विराट आहे अर्थात तिचा निर्माताही विराट आहे म्हणूनभगवंत सर्वव्यापी आहे. तर मग त्याची अनुभूती, प्रचिती कशी येणार, त्यासाठी अंतःकरण शुद्धी पाहिजे,त्या विषयी भाव असला पाहिजे,आपले चित्त शुद्ध केले पाहिजे,चित्त शुद्धी म्हणजे काय,

“ते विषयां सक्ती ज्याची उडे । त्या नाव चित्त शुद् जोडे । ते हृदयी आतुडे सर्व सापडे परमात्मा.(श्रीसंतएकनाथ महारा महाराज)

भावेविण देव न कळे निःसंदेह । गुरू वीण अनुभव कैसा मिळे ।। ( श्री संत ज्ञानेश्वर)

भावे भाव राहे पायी।देव तैसन्निध । (श्री संत तुकाराम महाराज)

म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी चित्त शुद्धीपाहिजे, दृढ भाव पाहिजे.परमेश्वराचे नित्य चिंतन जप केला पाहिजे.जो नित्य नामस्मरणकरेल,अनुसंधान करील, भगवंताशी तादात्म्य होईल त्यालाच भगवत प्राप्ती होईल. भक्त,भगवंत,नामहे तीनही एकरूपच आहेत. जिथे नाम, तिथे भक्त, जिथे भक्ततिथे भगवंत.

एक ज्वारीचा दाणा असतो,आपण जर सांगितले की,यात हजार दाणे आहेत तर यावर कोणी विश्वास ठेवणार नाही,करण तेदिसत नाही,दृश्य स्वरूपात नाहीत. एकज्वारीचा दाणा जेव्हा जमिनीत पेरला जातो, त्याला खत पाणी घालून मशागतकेली जाते, त्या वेळेस त्याचे कणीस तयार होते व त्या कणसात हजार दाणे असतात, दिसतात. म्हणजे मुळात एका दाण्यात हजार दाणे होते, हे मान्यच करावे लागेल.

तसाच परमार्थाचा मार्ग आहे. जपाचे पाणी घालून, भावाचे खत घाला, भक्तीचा मळा फुलवा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, याची अनुभूती येईल प्रचिती येईल.

— सुधाकर काटेकर
मो.न.9653210353

सुधाकर गोपीनाथ काटेकर
About सुधाकर गोपीनाथ काटेकर 2 Articles
सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून शिक्षण BA., B.Ed. अजूनपर्यंत कोणतेही लिखाण केले नाही. प्रयत्न करून पाहणार आहे. प्रेरणा म्हणून स्वत:चे अनुभव लिहीत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..