पाणी शोषत असतां ऊर्जा,
उकळ बिंदूवर येते ।
पाण्याचे रुप बदलूनी,
वाफ त्यांतून निघूं लागते ।।१।।
एक स्वभाव प्रकृतिचा,
स्थित्यंतर जेव्हां घडते ।
एक स्थिती जावून पूर्ण,
दुजामध्ये मिसळून जाते ।।२।।
तपोबलाची ऊर्जा देखील,
मानसिकता बदलून टाकीते ।
रागलोभादी षडरिपू जाऊनी,
साक्षात्कारी तुम्हां बनविते ।।३।।
तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं,
ईश्वरमय होऊन जाता ।
सारे परि ते तेव्हांच घडते,
परम बिंदूला जेव्हां पोहंचता ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply