नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग ५ /११

  • माधवी जोशी यांच्या प्रतिक्रियेबद्दल :

माधवी जोशी यांच्या  मुद्द्यांशी मी basically सहमत आहे. एकदोन गोष्टींचा थोडाफार खुलासा.

  • मॅक्सम्युलरबद्दल आपण आधी पाहिलेंच आहे. मेकॉलेच्या भारतविषयक मतांबद्दल इथें मुद्दाम लिहायची  आवश्यकता नाहीं. मेकॉले इंग्लंडला परत गेल्यावर, आपल्या ‘scheme’ च्या पूर्तेसाठी योग्य माणसाच्या शोधात होता. त्याला मॅक्सम्युलर सापडला. मॅक्सम्युलरला इंग्लंडमधून त्याच्या रिसर्चसाठी  grant मिळत होती, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे. तसेच, १९व्या शतकात, युरोपियनांना, ख्रिश्चॅनिटीबाहेरील-लोकांना ख्रिस्ती करून घेण्याचे ‘वेड’ होतें. मॅक्सम्युलरही त्याला अपवाद नव्हता. तिसरें म्हणजे, भारत हा त्या काळीं ‘जित’ देश होता. अशा देशाची संस्कृती       अति-पुरातन व प्रगत कशी असूं शकेल, असें  अनेकानेक युरोपियनांना वाटत असे.

या सर्व गोष्टींमुळे, मॅक्सम्युलरचे विचार आपण, ‘with a pinch of salt’ च घ्यायला हवेत. याचाही उल्लेख आपण आधी केलेलाच आहे. ( मात्र, त्याचे कांहीं विचार बरोबरही होते ; तें तपासून घ्यायला हवेत).

  • बाबासाहेब आंबेडकरांचे भाग्य असें की, त्यांचे वडील सैन्यात होते. नाहीं म्हटलें तरी, पलटणीत, बाहेरील-समाजापेक्षा असमानता कमीच असते. त्यांचे वडीलही महात्मा फुले यांच्या विचारांचे चाहते-पुरस्कर्ते होते. याचा बाबासाहेबांना , त्यांच्या growing age मध्ये नक्कीच फायदा झाला.

त्यामुळे, बाबासाहेबांनी समाजातील विषमता दूर करण्यावर भर दिला, संस्कृत भाषेवर राग धरला नाही. जर तुमच्या-माझ्यासारख्या साधारण लोकांना हें जाणवतें की, दोष जो असेल तो समाजातील कांहीं घटकांचा होता, भाषेचा नब्हे ; तर बाबासाहेबांसारख्या असामान्य प्रतिभेच्या व्यक्तीच्या तें ध्यानात आलें नसतें तरच नवल !

कर्णाच्या मुखीं घातलेले शब्द बाबासाहेबांना लागू पडतात, ते असे : ‘दैवायत्त कुले जन्म: मदायत्त तु पौरुषम्’. जन्म कुठे व्हावा हें दैवाधीन असतें, पण आपलें कर्तृत्व आपल्या स्वत:च्याच हातात असतें. बाबासाहेबांनी स्वत:चें कर्तृत्व सिद्ध केलें यात शंकाच नाहीं.

  • संस्कृतच्या बाबतीत, बाबासाहेबांनी logically विचार केला, व तिचा समृद्ध इतिहास पाहून,    Link-Language होण्याची तिची क्षमता पाहून, तिला राष्ट्रभाषा बनवण्यासाठी Zealously  आपला support दिला. संविधानासाठीच्या drafts चे मसुदे मुख्यत्वें आंबेडकरच तयार करत.              तें प्रपोजल असें होते :
  1. The official language of the Union shall be Sanskrit.
  2. Notwithstanding anything contained in Clause 1 of this article, for a period of fifteen years from the commencement of this constitution, the English language shall continue to be used for the official purposes of the Union for which it was being used at such commencement : provided that the President may, during the said period, by order authorize for any official purposes of the Union the use of Sanskrit in addition to the English language.

दुर्दैवानें तें प्रपोजल पास होण्यासाठी फक्त एक मत कमी पडलें.  (फक्त एकच मत ! )

पण, यावरून दिसून येते की, या प्रपोजलसाठी, विविध प्रांतीय लोकांचा, दलितांचा, मुस्लिमांचाही किती सपोर्ट होता.

(संदर्भ : USA स्थित ज्येष्ठ विचारवंत लेखक राजीव मलहोत्रा यांचा ग्रंथराज, ‘The Battle           For Sanskrit : Is Sanskrit Political or Sacred ? ; Oppressive or Liberating ? ;    Dead or Alive ?’ ).

  • त्यामुळे, ( आतां संस्कृतला राष्ट्रभाषा बनवण्याबद्दलचें जाऊं द्या, पण, ) संस्कृतबद्दलचा आकस तरी बाबासाहेबांच्या अनुयायांनी सोडून दिल्यास बरें होईल.

(पुढे चालू )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..