शिवरायांनी एक पुल बांधला होता माहिती आहे का..?????
प्रतापगडाच्या पायथ्याशी “पार्वतीपुर” नावाचे एक गाव आहे नंतर त्यांचे “पार”असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता,त्याच खणखणीत नि योजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे.
८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.
कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब,८ मीटर रुंद असा भक्कम दगडी पुल निर्माण केलेला आहे.पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत, त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम चुन्यात केलेले आहे.
सुमारे साडेतीनशेवर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे, दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभर उंचीचा ३० सेमी / १ फूटी दगडी कठडा आहे.
पाण्याचा प्रवाहाचा तडाखा सोसत, पाणी झिरपण्याच्या धोक्यावर मात करत, काही शतके देखभाल न करावी लागणं हेच त्या भक्कम बांधकामाचे वैशिष्ट्य आहे.
So unmatched ,capability bridged by selfless integrity ,marshalled by chatrapati shivaji maharaj, true example of worksmanship and leadership.