गुजरातच्या जुनागढमधील एका मध्यम वर्गीय मुस्लिम कुटूंबात परवीन जन्माला आली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल, १९४९ रोजी झाला. तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. परवीन यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादेत झाले. इंग्लिश साहित्यात तिने मास्टर्स पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली होती. तिचे इंग्लिश अगदी अस्खलित होते, परवीन वली मोहम्मद खान बाबी उर्फ परवीन बाबी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तिच्या आरसपानी सौंदर्याने तिला बॉलीवूडने खुणावले. ती आली, तिने पाहिले अन तिने जिंकले अशी तिची अवस्था झाली. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले अन अनेक फ्लॉपही झाले. पण ती ग्लॅमरची आयडॉल बनून राहिली. ८० च्या दशकात झीनत अमानच्या बरोबरीने परवीन बाबीसुध्दा बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नावारुपास आली होती. या दोघींमध्ये काही फरक होते.
झीनतचे विचार पूर्णत: व्यवसायिक होते. तिने आपल्या प्रत्येक यशाला आणि अपयाशाला समजून-उमजून संभाळले. परंतु परवीनने असे कधीच केले नाही. कदाचित छोट्या शहरातून आलेली परवीन ग्लॅमरस आणि श्रीमंत आयुष्य संभाळू शकली नाही. तिच्या वाट्याला आलेले बेसुमार ग्लॅमरस आयुष्य आणि यश हेच तिचे शत्रू बनले. त्यामुळे बॉलिवूडध्ये तिला प्रत्येकजण आपला शत्रुच्या रुपात दिसत होता. तिच्या या वागण्यानेच सर्वांनी तिच्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्याचा फायदा घेतला. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी परवीन १९७६ मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी परवीन पहिली भारतीय अभिनेत्री होती. खासगी आयुष्यात ती बोल्ड आणि बिनधास्त होती. यश चोप्रांच्या ‘दीवार’ या सिनेमात तिने बोल्ड सीन्स दिले होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीच्या जोडीला त्याकाळात बरेच पसंत केले गेले होते. ‘अमर अकबर एंथोनी’, ‘दीवार’, ‘शान’, ‘ख़ुद्दार’, ‘काला पत्थर’, ‘सुहाग’, ‘नमक हलाल’ या सिनेमांमध्ये ही जोडी झळकली. १९७३ मध्ये ‘चरित्र’ या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या परवीनने आपल्या करिअरमध्ये ५० सिनेमांमध्ये अभिनय केला. १९८८ मध्ये आलेला ‘आकर्षण’ हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
१९७४ मध्येय प्रदर्शित झालेला मजबूर आणि १९७७ मध्ये अमर अकबर एंथोनी ही त्यांची करिअरमधील सर्वात हिट राहिलेली चित्रपट राहिलेली आहेत. त्या पडद्यावर जितक्या धाडसी आणि बिनधास्त होत्या, तेवढ्या खासगी जीवनात खूप एकाकी होत्या. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी हिच्या आयुष्याचा अखेरचा काळ खूपच बिकट गेला. डॅनी, महेश भट्ट, कबीर बेदी सारख्या प्रसिध्द’ कलाकरांबरोबर त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्येव राहिल्या. परवीन बाबी यांचे निधन २० जानेवारी, २००५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
Leave a Reply