हादरून गेलो मनात पूरता, ऐकून त्याची करूण कहानी
केवळ एका दु:खी जीवाने, हृदय दाटूनी आणीले पाणी
असंख्य सारे जगांत येथे, प्रत्येकाचे दु:ख निराळे
सहन करिल का भार येवढा, ऐकूनी घेता कुणी सगळे
सर्व दुखांचा पडता डोंगर, काळीज त्याचे जाईल फाटूनी
कसाही असो निर्दयी कठोर, आघात होता जाईल पिळवटूनी
मर्म जाणीले आज परि मी, पाषाणरूप तुझे कां देवा
सर्वजणाची दु:खे झेलण्या, वज्र देह हा धारीला असवा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply