एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं
भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी ।।
भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा
जाणीव होई येतां प्रसंग, त्याला कटण्याचा ।।
धरतीवरी कोसळत असतां, दृष्टी टाकी आकाशीं
इतर पतंग बघूनी बोलला, तोच स्वतःशीं ।।
” नभांग मोठे दाही दिशा त्या, संचारा स्वैरपणें
आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळें जगणें ” ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply