” कुठे आहेस आत्ता ? ”
” Whatsapp चा असा दुरुपयोग नाही करायचा . ”
” दुरुपयोग कसला ? तू सेशन घ्यायला पुण्याला गेला आहेस आणि पाऊस खूप आहे म्हणून काळजीने विचारले . ”
” काळजीने की प्रेमाने ? ”
” प्रेम आहे म्हणून काळजी आहे , महाराज ” .
” वेडाबाई , मी इतका सतत फिरत असतो की आता खरंच अशी काही काळजी करावी असं काही उरलंय का ? आणि अशी इतकी माझी काळजी करायला लागलीस तर कसं व्हायचं ? ” .
” ते खरे आहे . म्हणून तर मी तूला ” पथिक ” म्हणते . ”
” नशीब माझे सतत रस्त्यावर असतो म्हणून पडीक नाही म्हणत मला तू . वर म्हनायचीस की तेही प्रेमाने आहे रे ”
” तू म्हणजे ना ? ”
” आणि बाईसाहेब तुम्ही मला पथिक नाही म्हणत ”
” मग ? ”
” पथिकवा ” .
” लक्षात आहे तर ! ”
” अर्थातच . पडीक , पथिक आणि पथिकवा हे तीन शब्द केवळ तीन वेगळे शब्द नसून तीन वेगवेगळ्या भावावस्था आहेत ग . आणि आपल्या माणसाबद्दल तर त्या तशा असतातच असतात . ”
” काय गंमत आहे ! गाते मी . न्रुत्याचा सराव करते मी . पण त्यातल्या रचनान्चे शब्द लक्षात ठेवतोस तू ” .
” शब्द – प्रेमी आहेच मी ”
” नशीब की तू मला शब्द किंवा तसं काही म्हणत नाहीस . तशाही शब्द आणि त्यांच्या अर्थाच्या नाना छटा या माझ्या सवतीं आहेत . ”
” निदान लाडक्या सवतीं तरी म्हण . त्यांच्या अंगणातला पारिजात तुझ्या दारात पसरण करतो ग . ”
” यस सर . आणि तू ज्या पध्दतीने ते सारे अर्थ , त्या साऱ्या छटा सांगत असतोस ना की त्यावेळी तुझ्या बोलण्याकडे लक्ष देताना तुझ्या मिठीचाही मोह सुटत नाही ना ”
” चलो यार . . . हा मोह असा बाहेर आला . ”
” हा पथिकवा शब्द सगळ्यात पहिल्यांदा माझ्याच मुळे ऐकला होतास तू . पण त्याचा भावार्थ समजावून सान्गितलास मात्र तूच ”
” म्हणून तर तुझा राग बिहाग इतका रंगतो . ”
” खरं आहे रे . आमचे गुरुजी ही त्यादिवशी गन्मतिने म्हणाले की मला प्रेमाचा स्पर्श झाला असणार आणि म्हणून ही बंदिश आत्ता मला चांगली मांडता येऊ लागली आहे . ”
” आत्ता तिथे खूप पाऊस पडतो आहे का ? ”
” किती दुष्ट आहेस . मी इतकं रंगून तूला छान whatsapp करते आहे आणि तू abruptly असा इतका भलताच अरसिक प्रश्न . . ” .
” मॅडम , अरसिक नाही ग . तिथे पाऊस पडत असल्याने माझ्या बरोबर रमतगमत फिरण्यास दिल करत आहे ना असं विचारायचं आहे मला . ”
” म्हणजे ? ”
” तुला सगळे कळलं आहे . ”
” पण सांग ना प्लीज़ . ”
” ओके डीअर . तू मला ज्या बन्दिशिवरून पथिकवा म्हणतेस त्याच्या अंतरा मधे व्यासबुवानी कसं छान वर्णन केले आहे . ते लिहून जातात आणि मनात गूँजत राहतात . . . . बेग मिल आवो , दरस की प्यासी ” .
” किती मनकवडा आहेस ! ”
” तसा आहे म्हणून तर तू माझी झालीस आणि आहेस . ”
” खर आहे . आत्ता रियाजालाच सुरवात करणार होते . तितक्यात गेट शी कार चा हॉर्न वाजला . तू नसणार हे माहीत होते तरी . . . . ”
” महान आहेस . इथेही खूप पाऊस आहे . ”
” ऐ ऐक ना , हॉर्न वाजला तेंव्हा तू नसणार हे माहीत असले तरी मी डोकावून बघितले . इतकी तुझी आठवण येतं होती . ”
” होती ? ”
” इतके काही शब्दांत पकडण्याची गरज नाही . ”
” अग , निदान याच बंदिशी मधली ओळ तरी म्हणायचीस ”
” किती स्वतचे आर्जव करून घ्यायचे .? ”
” मीच म्हणतो बास . . . . की जे न मौसे निठुराई ऐसी . . हे तू मला म्हणायच्या ऐवजी मीच नेहमीच म्हणतो तुला . ”
” म्हणतोस तेच बरे आहे . तू गाऊ नकोस . माझं तुझ्यावर कितीही प्रेम असले तरी मी तुझे गाणं काही अइकनार नाही . कधीच .. . . इतनु सन्देसा पियाको . . ”
” कि जे न मौसे निथुराइ ऐसी . . . ”
” हा हा . . . . ”
” चला . त्यामुळे तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तर पुन्हा शब्दांत आले तुझ्या . ”
” काय करणार ? मी जरी किती गायन – न्रुत्य यात असले तरी ज्याच्या प्रेमात पडले आहे तो शब्दांच्या क्षेत्रातला आहे ना ! ”
” ले जा रे जा ”
” तूच सांगितले होतेस ना की पथिक हा खरा शब्द . प्रेमाचा माणूस असले किंवा विरहाचा संदेश असला की बोलीभाषेत तोच शब्द पथिकवा होतो . कधी कधी तर उच्चारताना तर परिगवा सुध्दा . लाडाचा उच्चार आहे तो . बलमा सारखाच . अगदी त्याला काहीही अर्थ नसला तरी . त्या दोन मनान्चा जणू काही तो सांकेतिक शब्द आहे . ”
” My . . ”
” त्यानंतर तू जे वाक्य सांगितले होतेस त्यांनी मी ठरवले होते की तुला होकार द्यायचा . ”
” राणी , पाऊस बाहेर कोसळत आहे की मनात ? ”
” तुला अपेक्षित असेल तिथे . तुझं वाक्य असं होत . . . . भाषेला व्याकरण असते ; भावनेला नाही . त्यामुळे द्न्यान ग्रहणात शिस्त हवी आणि त्याच्या अभिव्यक्ति मधे नजाकत . ”
” हे वाक्य म्हणजे माझं मंगळसूत्र . . . ”
” जेंव्हा – जेंव्हा मी तन्बोरा गवसनितून काढते किंवा पायात घुन्गरू बाँधते तेंव्हा दरवेळी मला हे वाक्य आठवत असते . ”
” आणखी काही ? ”
” आणि प्रत्येक performance नंतर इतरांनी कितीही कौतुक केले तरी तुझ्या डोळ्यांत जे दिसते , तुझ्या गळ्यात मी हात टाकून तुझे निरीक्षण ऐकत असते तेंव्हा जे जाणवत ना ते खरं ! जेंव्हा तू नसतोस ना तेंव्हा माझाच मला इतका राग येतो की मी तुला किती miss करते हे तेंव्हा मला पुन्हा पुन्हा कळत राहते . ”
” Really ? ”
” what do you mean ? Do you have any doubts about it ? त्यावेळी माझ्या नकळत माझं मन ” की जै न मौसे निठुराई ऐसी ” अशी तुलाच साद घालत असते रे ! ”
” आता हे सान्गाताना नेहमिसारखे मधे बोलू नकोस असे न दटावल्या बद्दल शुक्रिया . ”
” काय करणार माझ्या आयुष्याचा गुनिजान आहेस ना ” आणि ते गुनिजान पण तू निभावतोस ना ! Telepathy असल्यासारखे तुझा फोन नाही तर मेसेज येतो तुझा अगदी त्याच वेळी . ”
” बिन गुणीजान कैसे सुख पावे ”
” इतके काही नको . ”
” खरंच ? ”
” सरळ इथे ये ”
” सांग ना मग . . . . सुख चैन मोहे कछूक नही भावे . . . असं झालय ना तुझे ?
” हे माझ्या पथिकवा ला सांगावे नाही लागत . ”
” सरकार . . . हा राग बिहाग आहे . रात्रीचा दुसरा प्रहर ही त्याच्या गायनाची वेळ आहे . आणि आता दुपारचा दुसरा प्रहर आहे . ”
” जवळ असताना पथिकवा मला . . . . . ”
— चंद्रशेखर टिळक
५ ऑक्टोबर २०१६
Leave a Reply