नवीन लेखन...

पत्रकार, नाटककार, लेखक, कवी आत्माराम सावंत

पत्रकार, नाटककार, लेखक, कवी आत्माराम सावंत यांचा जन्म ७ मार्च १९३३ रोजी  हुमरस अण्हेरी, सिंधुदुर्ग जिल्हा येथे झाला.

आत्माराम सावंत यांचे बालपण कोकणात गेल्यामुळे लहानपणापासून कीर्तनाची व गणपतीत होणार्या मेळ्यांची आवड होती. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांनी आत्माराम यांना मॅट्रिकपर्यंत शिक्षण देऊन नोकरीसाठी मुंबईला धाडले. मुंबईत आल्यावर आत्माराम सावंत नव्यानेच सुरू झालेल्या कामगार नाट्यस्पर्धेत सहभागी होऊ लागले. १९५३ ते १९६० या काळात त्यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी अनेक कौटुंबिक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि काही पारितोषिकेही मिळवली.१९६० ते १९७० या काळात सावंत दैनिक नवाकाळ आणि दैनिक मराठामध्ये पत्रकारिता करत होते. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी आपले अनुभवांवर बेतून शब्दबद्ध केलेली ’चौथा अंक’ आणि खुर्चीचा खेळ’ ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. नवशक्ती, नवाकाळ, मराठा आणि मुंबई सकाळ या विविध वृत्तपत्रांत आत्माराम सावंत यांनी उपसंपादक, सहसंपादक मुख्य संपादक आदी विविध पदांवर काम केले आहे, आणि ते करताना बरेच स्फुट लेखन केले. १९७० मध्ये आत्माराम सावंत परत रंगभूमीकडे वळले. याच काळात त्यांना नाटककार म्हणून अपार लोकप्रियता मिळाली. राजकारण गेल चुलीत–वरचा मजला रिकामा हि त्यांची नाटके खुप गाजली. १९९४ साली मालवण येथे भरलेल्या ७४व्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष राहिले होते.

त्यांची इतर नाटके.
आगपेटीतील राक्षस (नाट्यदर्पण पुरस्कारप्राप्त व्यावसायिक नाटक, १९७७)
आई म्हणोनी कोणी (व्यावसायिक नाटक)
जन्माची गाठ (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
ताठ मानेचा माणूस (व्यावसायिक?)
तेथे पाहिजे जातीचे (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
दरोडा (व्यावसायिक नाटक)
माझं कुंकू (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
मुजरा घ्या सरकार (व्यावसायिक नाटक)
मुलगी (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
सत्तेवरचे शहाणे (नाट्यदर्पण पुरस्कारप्राप्त व्यावसायिक नाटक, १९८८)
सासरेबुवा जरा जपून (व्यावसायिक नाटक)
सूनबाई (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)

आत्माराम सावंत यांचे ४ मार्च १९९६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4358 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..