नवीन लेखन...

पत्ते, बंगला आणि माणसाची निरागसता ! 

नुकत्याच एका छंदिष्ट मित्रांच्या प्रदर्शनामध्ये मी माझ्याकडील विविध आणि विचित्र पत्ते मांडले होते.  १ इंच ते दीड फूट आकाराचे,गोल- लंबगोल, चौकोनी- पारदर्शक- Z आकाराचे -५२ वेगवेगळ्या  मांजरांच्या चित्रांचे- अत्यंत विचित्र आकाराचे, जादूसाठी वापरले जाणारे, विविध सणांची माहिती देणारे अशा विविध प्रकारचे दुर्मिळ पत्ते आणि गंजिफा, टॅरो कार्ड्स, अंध व्यक्तींसाठी ब्रेल मधील पत्ते इत्यादी प्रकारचे हे पत्ते होते. या वेळी एक शोभेची वस्तू म्हणून मी पत्त्यांचा बंगला ठेवला होता. सर्व पत्ते  फेविकॉलने चिकटवले होते. पण अगदी मोठ्या वयाचे प्रेक्षकही पटकन  ” वाऱ्याने बंगल्याचे पत्ते पडत कसे नाहीत ” असा प्रश्न हमखास विचारायचे. लगेच ते सावरून, ” हां, चिकटवले असतील ” असे म्हणायचे. मला मोठी गंमत वाटायची. माणूस मोठा होऊन सगळ्या कॢप्त्या, लबाड्या शिकतो. पण लहाणपणी निरागसतेने बंगला बांधताना तो वाऱ्याने सतत पडायचा हे मात्र त्याने त्याच निरागसतेने मनात जपलेले पाहून गंमत वाटायची.त्याला पटकन आठवायचा आधी तो , ” पडणारा बंगला ” आणि मग फेविकॉल ! 

या निमित्ताने पत्त्यांविषयी थोडे — 

पत्त्यांचा खेळ

p-34957-Patte-02अगदी छोट्या मुलापासून आजोबांपर्यंत आणि गरीबांपासून गडगंज श्रीमंतांपर्यंत, आपली पाळेमुळे घट्ट रोवलेला खेळ म्हणजे पत्त्यांचा खेळ ! जागा, वेळ, वय किंवा आर्थिक स्तर असे कसलेही बंधन नसलेला हा एक विश्वव्यापी खेळ आहे. आजोबा आणि नातू यांच्या निरागस “ भिकार-सावकार “ खेळापासून ते थेट लाखो रुपयांची हारजीत करणाऱ्या जुगारापर्यंत हा खेळ फिरतो. सतत कोसळत असूनही पुन्हा पुन्हा बांधायचा प्रयत्न करायची सहजपणे शिकवण देणारा “ पत्त्यांचा बंगला “ आपण अनेकांनी अनेकदा लहानपणी बांधलेला असतोच ! मराठी साहित्याला या खेळाने अनेक नवीन शब्द दिले. जीवनात येणारी परिस्थिती आणि हातात येणारे पत्ते हे आपल्या इच्छेनुसार येत नसल्यामुळे , पत्त्यांची उपमा अध्यात्मिक पातळीवरही पोचते. …. आणि आजवर पाहिलेल्या पत्त्यांच्या जादू तर कोण विसरणार? अनेकांनी पत्त्यांच्या आधाराने सांगितले जाणारे भविष्यही जाणून घेतले असेल.

अशा या पत्त्यांचा सर्वात जुना उल्लेख चीनमध्ये ९ व्या शतकामध्ये आढळतो. तेव्हा ३२ पत्तेच होते. नंतर हे पत्ते १३ व्या शतकात मंगोल आक्रमकांनी “ सिल्क रोड ” मार्गे पर्शियात नेले. तेथे त्याला गंजीफेह म्हणत. मोगल आक्रमकांनी १६ व्या शतकात पत्ते भारतात आणले. भारतात पत्त्यांनी गोल आकार धारण केला. विष्णूचे १० अवतार, राशी, नवग्रह यांच्या आधारानी पत्त्यांची संख्याही १२० वर पोचली. आत्ताच्या स्वरूपातील पत्ते साधारणत: १५ व्या शतकात अवतरले. तेव्हा सर्वात कमी मूल्याचा पत्ता नेव्ह ( KNAVE ) म्हणजे “राजपुत्र” असा होता. आजही पत्त्यांच्या अनेक खेळांमध्ये राजा सर्वात मोठा की एक्का मोठा, असा प्रश्न असतोच. पत्त्यांमध्ये जोकर आणायची मूळ कल्पना अमेरिकन लोकांची पण जोकरांचा धुमाकूळ मात्र हल्ली सगळ्या क्षेत्रातच दिसतो.

मकरंद करंदीकर
टे – (०२२) २६८४२४९०

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..