पाऊस! हा तुझा नी माझा
तनमनांतराला भिजविणारा…
ओल्या ओल्या चिंब भावनां
पाऊस! मिठीस बिलगणारा…
जीवा जीवालाही हवाहवासा
व्याकुळ अधीरतेने बरसणारा…
मनमुक्त प्रीतीत भुलूनी जाता
अधरांनी, प्राशावी अमृतधारा…
श्रावण, श्रावण बेधुंद कलंदर
श्वासा, श्वासातुनी गंधाळणारा…
प्रीतासक्ती, तो अवीट पाऊस
चिंबचिंब सर्वार्थी भिजविणारा…
ओला पाऊस मृदगंधली माती
सुगंध सभोवार तो दरवळणारा…
वर्षा ऋतुची किमयाच आगळी
नाहू घालते सरितुनी चराचराला…
रचना क्र. ५७
२५ /६ /२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
Leave a Reply