बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते
रक्षाबंधनाच्या दिवशी,
बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी सुरु होते
का त्याच दिवशी?
एकदा भावाच्या मनगटावर राखी
बांधली म्हणजे घेतली शपथ
भावाने बहिणीच्या सुरक्षेची
आणि पवित्र बंधनाची !
एका वर्षात विसरला का भाऊ
आपल्या बहिणीला?
का लक्षात राहावे म्हणून
पुनःपुन्हा दरवर्षी राखी
बांधावी लागते भावाच्या
मनगटावर बहिणीला?
एवढे का तकलादू नाते असते जे
खुंटा ठोकून घट्ट करण्यासारखे
केले जाते राखी बांधून !
मग का करतात तेच हात
हत्या निर्घुणपणे आपल्या बहिणीची?
का करतात काही ‘भाऊ’
अत्याचार आणि बलात्कार
दुसऱ्यांच्या बहिणीवर?
तेव्हा का नाही आठवत राखीच्या
पवित्र बंधनाचे नाते
त्याने बहिणीसाठी जपलेले?
जगदीश पटवर्धन
Leave a Reply