पावसाळ्यात केसांमध्ये फंगल इन्फेक्शन होते. यासाठी काही घरगुती उपाय –
– २ टेबलस्पून व्हिनेगरमध्ये १ टेबलस्पून लिंबुरस मिसळून स्काल्पला आठवड्यातून दोनदा लावा आणि मग धुवून काढा.
– मेथी पेस्टमध्ये तीन टी स्पून ऑलिव्ह, अर्धा टी स्पून कॅस्टर ऑईल आणि नारळाचे तेल मिसळा व केसांना लावा व अर्ध्या तासाने धुवून काढा.
– बियरने केसांना फायनल रिंस करा.
– पावसाळ्यात शक्यतो शॉर्ट कपडे वापरा.
– थ्री फोर्स, हॉट पँट्स, बरमुडा, ले-गिन्स इ. फ्रॉक्स, मिडीजही वापरू शकता.
– हिरव्या रंगाचे सगळे शेडस् आपल्या कपड्यांमध्ये असू द्या. मोठ्या डिझायनची प्रिंट उदा. फ्लॉवर्स, गोळे इ. कपड्यांवर खुलून दिसतात.
– पावसाळ्यात कपड्यांचा रंग हिरवा, गुलाबी, कोरल आणि पिवळा असेल तर फ्रेश फिल येतो.
– पॉली नायलॉन आणि कॉटनचे नवनवीन ब्लेंड फॅब्रिक्स पावसाळ्यात उत्तम पर्याय आहेत.
– पंजाबी ड्रेसमध्ये क्रेप आणि शिफॉनचे फॅब्रिक सोयीस्कर पडतात.
– पावसाळ्यात वॉटरप्रुफ स्लीप ऑन, स्लिपर्स स्टिलेटोज, फ्लिप फ्लॉप हे फूटवेअर्स उपयोगी पडतात.
– पावसाळ्यात पोटात गॅस होण्याचे प्रमाण दिसते. त्यामुळे जेवणात गोड, आंबट, तुरट पदार्थांचा समावेश असू द्या. हलका, पाचक, तेलरहित आहार असावा.
– जेवणात पुदिना, लिंबू, खजूर, लाल तांदूळ, मूग आणि गहू यांचा अधिक समावेश असावा.
– हिरडा, गूळ व साखर एकत्र करून खाल्ल्याने पित्तदोष नष्ट केले तर उपाशीपोटी ३०-४० तीळ चावून थंड पाणी प्यावे, यामुळे वातदोष नष्ट होतो.
– पावसाळ्यात अंगावर खरुज होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. यावर दिवसातून दोन ते तीन वेळा तुळशीच्या पानांच्या रसात लिंबुरस मिसळवून लावल्यास फायदा होतो.
– सर्दी – खोकल्याचा त्रास होत असल्यास तुळशीची पाने, आले व मध मिसळवून दिवसातून २-३ वेळा खावा. तुळशीची पाने, आले आणि हळदपूड घालून पाणी उकळवा आणि चहासारखे प्या, लाभ होतो.
Leave a Reply