नवीन लेखन...

पावसाचं आगमन

पण नरिमन पॉइंटवर पांढऱ्या शुभ्र झग्यातले, डोळ्याला पांढरं मुंडासं वर काळी फीत लावलेले अरबस्तानातील लोक जमायला लागले, की समजावं आता पावसाळा आला. वाळवंटात राहणारी ही मंडळी. त्यांना पावसाचं विलक्षण आकर्षण. पावसापेक्षा पावसाच्या आगमनाचं, पहिल्या पावसाचं.


 पावसा पावसा ये ये. पाऊस पडावा अशी चातकाप्रमाणे वाटपाहत राहावं आणि उन्हाळा अंगावर झेलावा. जितका उन्हाळा कडक तितका पाऊस बहारदार. उन्हाळयाशिवाय पावसाचं सुख कळत नाही. जसं दु:खाशिवाय सुख काय असतं ते कळत नाही.

उन्हात घामेजून गेलेली मुंबई पावसाची वाट पाहत राहते. चारी बाजूला समुद्र पसलेला. त्याची उष्णता जाणवत राहते. जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसा आता पावसाळा येणार केव्हा- त्याचे तर्क-वितर्क, अंदाज व्यक्त होत राहतात- लोकलमध्ये, ऑफिसात, कट्टयावर. दरवर्षी उन्हाळा फारच कडक होता, असं प्रत्येक जण म्हणत राहतो.

पण मुंबईसारखा पास नाही. मस्त अंगावर खेळवावा असा. पडतो तर धो धो कोसळतो. वाटत पाहत थांबत नाही. चार –पाच दिवस पडत राहतो. मग उसंत घेतो. त्याच्या साथीला उसळणारा सागर असतो. त्याची लज्जत वाढवायला.

एकाएकी ढगांची काही छत्री उघडली जाते. काळोख दाटून येतो आणि पावसाला सुरुवात होते. घाटमाथ्यावरुन जसा गारांचा वर्षाव होतो, उन्हात पाऊस पडतो आणि मान्सून येणार याची चाहूल लावून जातो आणि महिना-पंधरा दिवसांनी पाऊस सुरु होतो. पण मुंबईत तस काही होताना दिसत नाही. क्वचितच- जवळच- नाहीच. पाऊस सुरु होतो तो एकदम.

तो लांबला तर तोंडच पाणी पळतं. लांबलांबवरुन पिण्याचे पाणी शहरात येत. तानसा, वैतरणा कोरडे पडू लागले की घशाला कोरड पडते. घराघरातले शॉवर -बाथ बंद पडतात. पिण्याच्या पाण्याचे हाल काय होतात ते मुंबई शहर सोडून गेल की समजतं. मुंबई शहर सोडून बाहेर जा. कुठल्याही शहरात जा. पाण्याचा प्रश्न आहेच. शहर सोडून गावात किंवा खेडयात गेल तर तो आणखी बिकट झालेला. त्यात पॉवरकटचा प्रहार आहेतच. आठवडयातून दोन-तीनदा तरी वीज जाणारच. मग घामाघूम. मुंबईत किमान घाम येऊन अंगातील उष्णता तरी बाहेर पडते. पण इतरत्र कोरडया हवामानात तेही शक्य होत नाही. अंगाची लाही -लाही होते. त्यामुळे उन्हाळयात डोकयावर पंखा असला,  की उन्हाळा सहन करण मुंबईत सोप जातं. पण बाहेरगावी तीच गोष्ट आणखी अवघड होते. माझी काही मित्रमंडळी आहेत ती रजा घेऊन घरी चक्क पत्ते खेळत बसतात. कुठे बाहेरगांवी जायच म्हणजे जायच- यायचं रिझर्व्हेशन करा. जायच मिळतं पण परत यायचा भरवसा नसतो. हॉलिडे होम्स हाऊसफुल्ल असतात. तर हॉटेल परवडत नाहीत. आणि राहायला जागा आहे की नाही माहीत नसे. कुठे तरी फॅशनेबल हिल स्टेशनला जाऊन धडकायचं. जागा शोधत वणवण फिरायच आणि जास्त पैसे देऊन पर गचाळ जागेतच राहायला लागायच. त्यापेक्षा मुंबईत राहणे सुखावह.

पावसाला आता हे कसं ओळखायच? अर्थात कुलाबा वेधशाळा आहेव. त्याचे अंदाज केव्हा खरे ठरतील आणि चुकतील याच भाकीत सांगण अवघड. पण नरिमन पॉइंटवर पांढऱ्या शुभ्र झग्यातले डोळयाला पांढरं मुंडस, वर काळी फीत लावलेले अरबस्तानातील लोक जमायला लागले, की समजाव आता पावसाळा जवळ आला. वाळवंटात राहणारी ही मंडळी. त्यांना पावसाच विलक्षण आकर्षण. पावसापेक्षा पावसाच्या आमनांच, पहिल्या पावसाच. त्यामुळै पाऊस येण्याअगोदरच स्थलांतरीत पक्षांसारखी ही मंडळी येऊन बसतात आणि चातकासारखी पावसाची वाटत पाहत नरिमन पाँईंटच्या कट्टयावर बसून समुद्राकडे बघत बसतात.

मुंबईचा पाऊस प्रेमात पडावा असा. पण ज्यांना 10 चे ऑफिस गाठायची घाई नाही त्यांच्यासाठी. मुंबईच्या पावसावर अनेकांनी लिहून ठेवलंय.

पावसाने भिजलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या इमारतीच, चालणाऱ्या वाहनांच, लोकांच आरशासारखं स्वच्छ प्रतिबिंब पडतं. महापालिकेसमोर आझाद मैदानातल्या डबक्यात महापालिका इमारतीच सुरेख छायाचित्र टिपणारा सॅबी फर्नांडिस एक कलाकृती निर्माण करुन जातो, तर मढेंकरांपासून ते डॉम मोप्सॅपर्यंत कवितांच तुकडया तुकडयातून डोकावत जातो. मार्शल टिटो मुंबईत आले असताना पडलेलया पावसावर बेहद्द खुश झाले हाते.

पण हाच पाऊस जो येतो तो एकच पहिला दणका असा देतो की चांगला लक्षात राहावा. पहिल्या पावसातच रेल्वेचं कंबरडं मोडतं. पश्चिम रेल्वे काय किंवा मध्य रेल्वे काय लोकल गाडया गोगलगाईच्या गतीने चालू असतात. नाही तर डबक्यात फुगल्या म्हशीसारख्या तासनतास बसून राहतात. ओव्हरहेड वायर पायाखाली येते, रुळावर फूट-दीडफूट पाणी साठतं. सगळ चिकचिक. बेस्टच्चा बसेस मात्र चिवटपणे जिथे रस्ता शाबूत असेल तिथपर्यंत धावत राहतात. मिठी नदीला पूर येतो. पाणी घराघरात शिरतं. ठाणे- कल्याणला तर काही ठिकाणी होडया वापराव्या लागतात. मग रेल्वे महापालिकेला दोष देते. असा खो- खो चा खेळ चालू राहतो. पाऊस पडता राहतो. लोक भिजत राहतात. पहिल्या आठवडयात इतका पाऊस पडतो की नको हा पाऊस असं वाटतं. पण पाऊस कमी- अधिक प्रामाणात पडत राहतो.

भर पावसात मुंबई न्हाऊन निघते. वर्षातून एकदा का र्होईना स्वच्छ होऊन टवटवीत दिसतं. पाऊस पडत राहतो. पाऊस संपल्यावर उन्हाळा. हिवाळा नावाचा प्राणी मुंबईतून हद्दपार केलेला आहे. उन्हाळा-पावसाळा आणि पावसाळा-उन्हाळा असं चक्र चालू राहतं.

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक ९ जून १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..