नवीन लेखन...

पेन ड्राईव्ह

आज संगणकाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झाला आहे.

संगणकावर काम करायचे म्हटले, की माहिती साठवणे आले. ही माहिती साठवण्याची अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यात सुरुवातीला फ्लॉपी डिस्क होत्या, नंतर सीडी आल्या, डीव्हीडी आल्या, पण त्या प्रत्येक साधनाचा आकार एकतर मोठा होता व काही ना काही उणिवा होत्या. सहजपणे हाताळता येईल असे एकही साधन नव्हते.

त्यातूनच १९८८ मध्ये आयबीएम कंपनीने पेन ड्राईव्ह ही कल्पना मांडली, पण त्यांनी त्याचे पेटंट घेतले नव्हते.

पेन ड्राईव्हचा शोध नेमका कुणी लावला याबाबत बरेच वाद आहेत. एम सिस्टीम्सचे डोव्ह मॉरन यांनीही १९९८ मध्ये पेन ड्राईव्हची कल्पना मांडली होती. मलेशियातील पुआ खेन सेंग या तरुणाने पेन ड्राईव्हचा शोध लावून ३१ अब्ज डॉलरची उलाढाल तैवानला मिळवून दिली असे सांगितले जाते. त्याची साहसकथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे यात शंका नाही.

पेन ड्राईव्ह हे हाताळण्यास अत्यंत सोपे फ्लॅश मेमरीवर आधारित साधन आहे. हा पेन ड्राईव्ह यूएसबी पोर्टमध्ये खोचून आपण हवी ती माहिती त्यात घेऊ शकतो. यूएसबी याचा अर्थ  युनिव्हर्सल सीरियल बस असा आहे.

आता संगणकच काय, पण टीव्ही व डीव्हीडी प्लेयरलाही यूएसबी पोर्ट असते. यात आपण चित्रपट, छायाचित्रे, गाणी अशी माहिती ठेवू शकतो, शिवाय कुठल्याच वायर्स बाळगाव्या लागत नसल्याने वापरायला तो सुटसुटीत असतो. आता २५६ जीबी मेमरीची पेन ड्राईव्हही उपलब्ध आहेत. त्याचा आकार पेनसारखा असतो म्हणून त्याला हे नाव पडले. डेटा ट्रान्सफर हे त्याचे मुख्य काम आहे. ट्रान्झिस्टर्स नावाच्या कंपोनंटची विशिष्ट रचना त्यात असते, त्यात ही माहिती साठवली जाते.

पेन ड्राईव्हमध्ये फ्लॅश मेमरी चिप, क्रिस्टल ऑसिलेटर, यूएसबी मास स्टोरेज कंट्रोलर, यूएसबी कनेक्टर असे भाग असतात. एकूणच पेन ड्राईव्हने माहिती साठवण व हस्तांतरात मोठी क्रांती घडवून आणली यात शंका नाही!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..