‘आमच्या मनात तुमच्याविषयी चीड आहे आणि ती वाढते आहे..!
गुजरात सार्वत्रिक निवडणूकांत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला, भा.ज.प.चं मन:पूर्वक अभिनंदन..!
काॅंन्ग्रेस हरली तरी त्यांच्या सिटांमधे वाढ झाली, हे ही काही वाईट नव्हे. कांग्रेसही अभिनंदनाला पात्र आहे..!
ह्या विजय-पराजयाचं अनुक्रमे आनंद आणि दु:ख साजरं करत असताना, एक अतिशय महत्वाची बाब कोणीही दुर्लक्षून चालणार नाही आणि ती म्हणजे, गुजरात निवडणूकीत जवळपास ४.७५ लाख मतदारांनी, म्हणजे अदमासे २ टक्के मतदारांनी NOTA चा (None Of The Above) पर्याय निवडला. देशातील जनता राजकीय पक्ष, त्यांचे नेते\कार्यकर्ते, त्यांचं कॅरेक्टर, त्यांची स्वत:ला श्रेष्ठ समजण्याची वृत्ती, त्यांच्या परिस्थितीत मती गुंग करणाऱ्या वेगाने होणारा बदल, निष्ठा, पक्ष बदलूगीरी याला वेगानं कंटाळत चालल्याचा हा इशारा समजायला हरकत नाही..आणखीही काही कारणं असतील, पण गत महारालिका निवडणूकांत मला ज्या कारणांमुळे NOTA वापरायचा वारंवार मोह होत होता, ती ही काही कारणं आहेत..
‘आमच्या मनात तुमच्याविषयी चीड आहे आणि ती वाढते आहे’ हा जनतेचा आक्रोश खंबातच्या आखातातून देशभर पसरत जायच्या पूर्वीच, गुजरात निवडणूकीने अधोरेखीत केलेल्या या महत्वाच्या मुद्द्याचा सर्वच राजकीय पक्षांनी, अगदी या क्षणापासूनच, गांभिर्याने विचार करणं आवश्यक आहे.
सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते वेळीच शहाणे झाले नाहीत तर त्यांचं, त्यांच्या पक्षाचं आणि पर्यायाने भारतातील लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या राजकीय व्यवस्थेचं भवितव्य अवघड होईल यात मला तरी शंका नाही..!
तेंव्हा, नेते-कार्यकर्तेहो सावध,
ऐका पुढल्या हाका..!!
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply