केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी पथ्य एकच. मी मला स्वतःला बदलायची तयारी ठेवायला हवी.
नेमकी जेवणाची वेळ कोणती आहे, यावर पुनः मतमतांतरे असण्याची शक्यता आहे.
आयुर्वेद म्हणतो. रोगाच्या मुळापर्यंत पोचा. तरच तो रोग कायमचा नष्ट होईल……
……केवळ वैद्य सुविनय दामले म्हणतो आहे, म्हणून नव्हे, हा अहंकार मुळीच नाही. एक आयुर्वेदभक्त म्हणून जे योग्य असेल ते सांगण्याची, आणि जे अनुभवले आहे ते इतरांना वाटण्याची मला आवश्यकता वाटते. म्हणून लिहितोय. नाहीतर मी माझ्या व्यवसायात ठीक आहेच.
समर्थ म्हणतात,
जे जे आपणास ठावे,
ते ते दुसऱ्यास सांगावे
शहाणे करूनी सोडावे
सकल जन.
मी खूप सकारात्मक बदललोय. माझ्यातला बदल मलाच आश्चर्य वाटणारा आहे.
मी जे माझ्या स्वतःवर प्रयोग करतोय, जे गेली पंचवीस तीस वर्षे प्रत्यक्ष अनुभवतोय, जे माझ्या आयुर्वेदीय ग्रंथात वाचले आहे, जे माझ्या अनेक गुरूंकडून शिकलोय, जे माझे अनेक रूग्ण श्रद्धेने करत आहेत, त्यांच्यातील बदलाचे अनुभव परत येऊन सांगताहेत, ते फक्त शब्दबद्ध करून सांगतोय. काय लिहायचे, हे सुचवणारी, लिहवून घेणारी ती निसर्गशक्ती ( देव म्हटलं तरी काही जणांना पोटशूळ उठतो हल्ली.) मला सतत मदत करतेय, त्यामुळे हे लेखन कर्तृत्व माझे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे.
कसं वागायचं, आणि ते कसं आचरणात आणायचं, स्वतःला कसं बदलायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
कायदे करून सगळे प्रश्न सुटत नसतात, कायद्याची भीती दाखवून तर काहीच होत नसते. अहो, पूर्वी पोलीस म्हटले तरी भीती वाटायची. आता काही वाटेनासे झाले आहे. भीतीचा बडगा संपलाय. भारतीय विचार सरणी ही कायद्यापेक्षा पाप आणि पुण्याला जास्त घाबरते, ही वस्तुस्थिती आहे, ही भारतीय मानसिकता आहे. जे चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांना सरळ मार्ग दाखवणे ही जर चुक असेल तर ही चुक मी वारंवार करेन.
धृतराष्ट्र आणि गांधारी प्रत्येक वेळी आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरुण घालत राहिली, चुकीच्या गोष्टींचे समर्थन करीत राहिली, म्हणून कौरव उन्मत्त झाले. आणि राजा असून देखील, संख्येने अधिक असूनही, स्वतः सकट स्वतःच्या कुळाचा सर्वनाश ओढवून घेतला. हा इतिहास विसरून कसा चालेल ?
चला, सावध होऊया.
त्या नीलकंठ शिवशंभुला शरण जाऊया.
आपल्या मनातील विद्वेषाचे विष नष्ट करूया.
अजूनही वेळ गेलेली नाही.
आयुर्वेद समजून घेऊन जगुया !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.02.2017
Leave a Reply