प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ वंदन नगरकर हे कॉर्पोरेट ट्रेनर असून ते गेली अनेक वर्ष याच क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. ते विनोदी अभिनेते, नाटककार, लेखक राम नगरकर यांचे चिरंजीव आहेत.
राम नगरकर यांच्या निधनानंतर वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. तसेच वंदन नगरकर हे कॉर्पोरेट ट्रेनर असून ते गेली अनेक वर्ष याच क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत ते राष्ट्रीय प्रशिक्षक असून त्यांनी विद्यार्थापासून अधिकार्या पर्यंत सर्वांसाठी दोन हजार कार्यशाळा घेतल्या आहेत, व्यक्तिमत्व विकास अथवा सॉफ्ट स्किल्स् जटील गंभीर विषयाला विनोदाची झालर दिल्यामुळे व हसत हसवत अतिशय खेळकर वातावरणात प्रशिक्षण येणे ही त्यांची खासियत आहे. यांच्या असंख्य कार्यशाळांचा लाभ वेगवेगळ्या संस्थांनी घेतला आहे व घेत आहेत
भाषणाचे प्रभावी तंत्र, भरारी यशाची, टर्निग पॉईट, पालकांचे चुकते कुठे? प्रभावी इंटर टेक्निक्स व स्पिक विव कॉन्फिडक्स (इंग्रजी) अशा सहा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. अनेक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
वंदन नगरकर हे राम नगरकर कला अकादमी, पुणेचे अध्यक्ष आहेत.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply