नवीन लेखन...

पेट्रोलियम: खनिज तेले

हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून रसायन शास्त्रात एक वेगळा विभाग तयार. होतो. पेट्रोलियम पदार्थ हे या भिन्न हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणांनी बनलेले असतात. त्या संयुगातील कार्बनची संख्या जेवढी जास्त त्यावरून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची वर्गवारी केली जाते.

हे पदार्थ ऊर्ध्वपातन पद्धतीने वेगळे केले जातात. सुमारे ७५०० पदार्थ पुरविणाऱ्या खनिज तेलाला विविध तापमानाला तापवून त्यांची वाफ वेगळी केली जाते. पुन्हा थंडावा देऊन त्यांचे द्रवात रूपांतर केले जाते. पेट्रोलियम खनिज तेलातील एक दोन आणि कार्बनयुक्त रसायने बाहेर काढली की त्यापासून नैसर्गिक वायू मिळतो. या वायूत मिथेन आणि इथेन ही वायुरूप संयुगे असतात. घरेदारे, कार्यालये उबदार ठेवण्यासाठी या वायूंचा वापर होतो. अलीकडे हा वायू पाइपद्वारा स्वयंपाकघरात पोहोचवला जातो. तीन ते चार कार्बनयुक्त संयुगांच्या मिश्रणाने हायड्रोकार्बन स्वयंपाकघरात सर्रासपणे वापरला जाणारा एल.पी.जी. (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) मिळतो. पाच ते दहा कार्बनयुक्त हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणातून खते व पेट्रोकेमिकल्स तयार करण्यासाठी लागणारे नॅफ्था हे द्रावण, पेट्रोलसारखे मोटारगाड्यांचे इंधन, तसेच बेंझिन, झायलीनसारखी उपयुक्त रसायने प्राप्त होतात. दहा ते बारा कार्बनने बनलेली संयुगे विमानासाठी वापरले जाणारे ए. टी. एफ.

(एविएशन टर्बाइन फ्युएल) तयार करण्यासाठी वापरली जातात. तेरा ते सोळा कार्बनच्या हायड्रोकार्बन संयुगांच्या, मिश्रणातून दिव्यात व स्टोव्हमध्ये जळणारे. EXTRE केरोसीन मिळते. रेलगाड्या, जहाजे, ट्रक, बसगाड्यांसाठी. लागणारे डिझेल तेल.. सोळा ते बावीस, कार्बनयुक्त संयुगांच्या मिश्रणाने प्राप्त केले जाते, तर घर्षण कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या… वंगणतेलात बावीस, ते अठ्ठावीस कार्बनपासून बनलेली रसायने असतात. शेवटी जो घनरूप चोथा उरतो.. त्याला डांबर म्हणतात. अनेक क्लिष्ट = रसायनांनी व्यापलेला डांबर हा बहुपयोगी पदार्थ असून तो रस्ते, विमानतळावरील 1 धावपट्ट्या, नदीचे बांध यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी उपयोगास येतो.

जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..