नवीन लेखन...

छोटीच्या मुखातून जीवनाचे तत्त्वज्ञान

संध्याकाळची वेळ मी फिरण्यास चाललो होतो. रहदारीची जागा, विश्रांती घेत एका बाकावर बसलो. अचानक एक लहान मुलगी अंदाजे ९ ते १० वर्षाची मजजवळ आली. तिच्या हातांत कांही रंगी बेरंगी फुगे होते. सर्व फुग्यांचे दोर एकत्र तिने हातात ते धरले होते.  “ आजोबा एक फुगा घेता कां. “

अतिशय आदर व प्रेमाने तिने विचारले. मी हसलो. “ बेटा माझ्या घरी कुणीच लहान मुल नाही. मला काय याचा उपयोग. “

अतिशय चुणचुणीत वाटली मला ती. आपल्या आईला थोडासा हातभार लावीत होती. मला तिच्या विषयीं थोडी दया व बरीच आपुलकी वाटू लागली. माझी नात ह्याच वयाची आहे. पण तिचे फुगे खेळण्याचे वय संपले होते. तिच्यामध्ये मला माझ्याच नातीचा क्षणभर भास होऊ लागला. चला घेऊत एखादा फुगा. तिला समाधान व आनंद वाटेल.

“बरं,  दे मला एक फुगा, काय किम्मत आहे त्याची“  “ फक्त दहा रुपये आजोबा. कोणत्या रंगाचा देऊ “ मी हसलो. फुग्यातच मला रुची नव्हती तर रंगांने काय फरक पडणार

“ कोणताही दे. पण मी विचारतो की तो फुगा जर फुटला तर काय करणार ? “

ती एकदम दिलखुलास हसली.  “ अहो आजोबा तो फुगाच आहे. फुटणे वा उडून जाणे हेच तर फुग्याच होत असतं ना. आमचे कितीतरी फुगे असेच फुटून जातात. मला नाहीं काहीं वाईट वाटत त्याचं. अहो फुटणारच ना फुगा !. हे पक्क मनांत ठरलं ना मग नाहीं दुःख होत अशा गोष्टीचे. फुगाच तो किती तास राहणार २, ४, ६ बस फुटणारच. त्याची कशाला तक तक करायची. बस फुटला की हसायच. त्यातच गम्मत असते. मी जर रडत बसले असते ना तर धंदाच करता आला नसता. आता मजा म्हणून सांगते जर हा फुगा माझ्या हातात असतांना फुटला तर माझ नुकसान खरं की नाही  आणि मी तुम्हांला विकला व तुम्हीं हातात घेतला, आणि जर कां तो फुटला तर तुमच नुकसान. बस जास्त विचार करायचा नसतो. “

किती साधे तिचे बोल होते. अगदी सहज ती ते व्यक्त करीत होती. त्या छोट्या मुलीजवळ केवळ प्रासंगिक अनुभवलेल्या घटनांची शिदोरी होती. ती ते मज जवळ उघडे करीत होती. आपण काय व्यक्त करतो ह्याची कदाचीत तिला कल्पनाही नसेल.  परंतु   जीवनाचे एक प्रचंड तत्त्वज्ञान ती माझ्यावर,  एक आजोबा झालेल्या वयावर फेकीत होती. जीवन तरी अजून वेगळे काय असते. क्षणिक, अनिश्चित, आणि ठरलेल्या काळ चक्रांत बंदिस्त.  आणि हे शंभर टक्के सर्वांनाच कळते. तरी आपण त्या जीवनचक्रांत गुरफटलेला असतो ना. जीवनाची सर्वांत मोठी गैरसमज म्हणजे, मी मरणार नाही हा विचार मनांत दृढ होणे हा. हाच जीवनांत सुखदुःखाच्या सतत लाटा निर्माण करतो. माणसे आशेवर जगत सारे सहन करतात. माहीत असून तो अविनाशी नाही. मुलगी म्हणते “ अहो फुगाच आहे तो.  फुटणारच ना फुगा. हे पक्क मनांत ठरल ना मग नाही दुःख होत. “  एखाद्या महान तत्ववेत्याने मनांत ठसवावे असे. माझे डोळे पाणावले. मी तीच्या हाती शंभराची एक नोट ठेवली. ती दहा फुगे मोजण्यांत गर्क असतांनाच मी हळूच उठलो व घरी आलो. शंभर रुपयांत मिळालेल्या जीवनाच्या महान तत्त्वज्ञानावर चिंतन करण्यासाठी.

— डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०

bknagapurkar@gmain.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..