नवीन लेखन...

फिरून थेम्सच्या प्रेमात (माझी लंडनवारी – 19)

अर्ध्या-एक तासाच्या प्रतीक्षेनंतर आमचा नंबर लागला. खूप उत्सुकतेने आम्ही क्रुझ वर पाय ठेवला. क्रुझ म्हणजे साध्या लाँच सारखी लाँच होती, पण वेल मेंटेंड होती. खाली चौकोनी खिडक्या असलेले बंद केबिन होते. बाजूला एक जिना, ज्यावरून तुम्ही केबिनच्या वर छतावर उभे राहू शकता. आम्ही अर्थातच डेकवर उभे राहणे पसंत केले. आमचा नंबर येईपर्यंत साधारण ३.५०-३.४५ झाले होते. उनही नव्हत. असलं असतं तरी उन्हात उभे राहिलो असतो, पण थेम्सच पूर्ण दर्शन चुकवल नसतं. भुरुभुरू वारा मनाला भुरळ घालत होता आणि समोर ती सुंदरी खुणावत होती.मग मन प्रसन्न नाही होणार तर काय!

एखाद्या मिशनवर गेल्यासारखे वाटत होते. सगळे जण योग्य जागा पकडून दबा धरून बसले होते. शत्रुची एकही हालचाल चुकावयची नाही,तसे ह्या राईड मधले सौंदर्य टीपण्याचा एकही क्षण वाया घालवायचा नव्हता.’नजर हटी, दुर्घटना घटी’! You will miss the golden moment. अशी जय्यत तयारी झाली आणि क्रुझने टेक ऑफ घेतले. आमची one of the most memorable journey सुरू झाली.

आमच्या मागे वेस्ट मिनिस्टर ब्रिज होता. पुढे अजून बरेच ब्रीज होते. थोड्या दूरवर टॉवर ब्रीज खुणावत होता.

वेस्ट मिनिस्टर ब्रीज white/off-white stones चा होता. सूर्य आणि ढगांचा उन- सावलीच्या खेळात सूर्यकिरणे पडल्यावर मध्येच सोनसळी पाण्यात सोन्यासारखा चमकत होता. किंबहुना त्याचे सोन-पिवळे प्रतिबिंब थेम्सच्या पाण्याला चमकवत होते. ब्रिजच्या दुसऱ्या टोकाला डौलाने उभे असलेले वेस्ट मिनिस्टर त्या सुवर्ण उत्सवात भर टाकत होते.

आता आमची क्रुझ सुरू झाली. लोकांना फोटोज् घेता यावे, आजु-बाजूचे सौंदर्य मन आणि डोळे भरून टिपता यावे म्हणून क्रुझ संथ गतीने पाणी कापत चालली होती.

ब्रिटिश लोकांच्या एका गोष्टीचे मला खूप कौतुक वाटले. त्यांची संस्कृती, त्यांचे हेरिटेज त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे जतन करून ठेवले आहे. त्यांच्या राणीचाही त्यांना तितकाच अभिमान आहे, जितका टेस्ट क्रिकेटचा! आपला देश, आपली माणसे, आपली संपत्ती ह्यांचा योग्य अभिमान आणि योग्य सादरीकरण हे फक्त ह्या लोकांनाच जमतं. इंग्रजांच्या शिस्तबद्धतेसारख आपल्या संस्कृतीचा आदर आणि जपणूक  हे पण शिकण्यासारखं आहे. ह्याचच एक उदाहरण म्हणजे लंडन ब्रीज!

आमची क्रुझ आता वेगवेगळ्या ब्रीजखालून जात होती. वॉटरलू, हंगर फोर्ड, गोल्डन जुबिली,  Southwark,  Black Friars असे किती तरी ब्रिजेस् आम्ही क्रॉस केले.

त्यात मला Black Friars ब्रीज जास्त आकर्षक वाटला.  शेजारी शेजारी असे दोन ब्रीज होते ते! एक रेल्वे ब्रीज आणि एक रोड ब्रीज. रेल्वे ब्रीज मोठमोठ्या रेड पिलर्स वर blueish cast iron ने बांधलेला होता तर रोड ब्रीज पिंक स्टोन्स ने बांधला होता. ब्रीजचे कठडे पण गुलाबी आणि नक्षीकाम केलेले होते.

पण ब्रिटिश लोकांना लंडन ब्रिजच का एवढं आकर्षण आहे? काही वेगळेपण आहे का ब्रीज मध्ये? म्हणून उत्सुकतेने लंडन ब्रीज कधी येतोय बघत होते. लंडन ब्रिजने जरा निराशाच केली. एकदम सिंपल रेड स्टोन मध्ये बांधलेला ब्रीज होता तो. पुढे चौकशी करताना कळले की, तो ब्रीज तीनदा पडला होता due to some another reason. अच्छा! म्हणून ती कविता आमच्या माथी मारली होती का?  ‘लंडन ब्रीज इज फॉलिंग डाऊन..’ एक गंमत आहे. इथे सगळं उलटच शिकवल जात. आपण ‘ये रे ये रे पावसा!’म्हणतो. ते ‘रेन रेन गो अवे!’ म्हणतात. त्या पडक्या ब्रिजवर कविता करतात. कमाल आहे!

असो! आता आम्ही मिलेनियम ब्रिज क्रॉस केला होता. मिलेनियम ब्रीजच्या डाव्या हाताला सेंट पॉल कॅथेड्रल दिसले.लांबूनही त्याच्या घुमटाच्या वैशिष्ट्य नजरेत भरत होते. ह्या सगळ्या मोहक दृश्यांमध्ये नदीची डौलदार वळणे अजूनच भर घालत होती.

नदीने पुन्हा असेच एक डौलदार वळण घेतले आणि समोर टॉवर ब्रीज. जसं काही आमचे स्वागत करण्यासाठीच उभा आहे. त्याचे निळ्या रंगाचे हँगिंग सपोर्ट एखाद्या तोरणासारखे वाटत होते. डाव्या बाजूला लंडनची शान टॉवर ऑफ लंडन दिमाखात उभा होता.

नदीच्या दोन्ही तटावर सुंदर ब्रिटिश कन्स्ट्रक्शन होती. एका बाजूला कॅनरी वॉर्फ, एका बाजूला एक अर्धवर्तुळाकार पूर्ण काचेची वाटणारी आणि पिसाच्या झुकत्या मनोऱ्यासरखी एका बाजूला कललेली ‘सिटी हॉल’ची बिल्डिंग. किती वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन आपले वेगळेपण दाखवत उभ्या होत्या.

थोड पुढे गेल्यावर नदीची रुंदी कमी होत गेली होती आणि आजूबाजूला असलेल्या सुंदर बिल्डिंगची दाटी पण! ती जागा आता हिरव्या landscapes नी घेतली. तो सेनिक व्ह्यु आम्ही डोळ्यात साठवत असतानाच, नदीने डिप इंग्रजी ‘एस’ आकारात खूप सुंदर वळण घेतले आणि आम्ही ग्रीनविच पिअरला होतो.

प्रवास संपता संपता थेम्सने आपले नजाकतदार आणि डौलदार मोहमयी दर्शन दिले. विविध ब्रिजेस् रंगाप्रमाणे रंगछटा धारण करणाऱ्या, आपल्या डौलदार वळणाने खिळवून ठेवणाऱ्या थेम्सच्या मी फिरून प्रेमात न पडते तरच नवल!

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..