नवीन लेखन...

फोन टॅपिंग

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन कसा मारला गेला, बटला हाऊस एनकाउंटर का घडू शकले, उत्तर प्रदेशातील गुंड श्रीप्रकाश शुक्ला याला मारण्यात यश कसे मिळाले या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे ते म्हणजे फोन टॅपिंगमुळे हे शक्य झाले. दिल्लीत किमान सहा हजार लोकांचे फोन टॅप होतात, तर महानगरांमध्ये १० ते २० फोन गुप्तचरांच्या किंवा पोलिसांच्या नजरेखाली असतात असे आता स्पष्ट झाले आहे.

मोबाईल फोनवर तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द अधिकारी ऐकू शकतात. तुमच्या मोबाईलमध्ये इलेक्ट्रॉनिक बग सोडून तो खोटा कॉल करून कार्यान्वित केला जातो. त्याला पिजिंग असे म्हणतात.

हे सगळे करता येते कारण तुमच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक हा संबंधितांकडे असतो. त्यामुळे तुमच्या सगळ्या हालचालींचा पत्ता पोलीस किंवा गुप्तचरांना असतो. मग तो फोन एकदा टॅप व्हायला लागला की, मोबाईल सेवा देणारी कंपनी व तुम्हाला कळतही नाही की काय चाललय.

रोव्हिंग बग हे सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये टाकल्यानंतर त्या मोबाईलवरून होणारे सगळे संभाषण हे संबंधितांना ऐकू येते. मोबाईल बंद असला तरी ती क्रिया सुरू राहते. बॅटरीच काढून टाकली तर मात्र टॅपिंग शक्य नसते. बहुतेक सर्व मोबाईल हे टॅप करता येतात.

आयएमईआय नंबरवरून केवळ त्यांचे ठिकाण कळते, फोन टॅप करता येत नाही. व्यक्तिगत कारणांसाठी फोन टॅपिंग करणे हा खरेतर गुन्हा आहे व त्यासाठी काही मोठा दंड केला जातो.

मोबाईल टॅपिंग टाळण्यासाठी फोन वापरात नसताना बॅटरी काढून टाकावी. ब्लूटूथ यंत्रणा चालू ठेवू नये. फोन टॅप डिटेक्टर किंवा फोन सिग्नल जॅमर किंवा टेलिफोन स्क्रॅबलर (स्पायहॉक डिटेक्टर सर्वात उत्तम) खरेदी करावा, त्यात लाल लाईट लागला तर तुमचा फोन टॅप होत आहे असे समजा. मोबाईल वापरात नसताना जास्त तापत असेल, जास्त वेळा चार्ज करावा लागत असेल, त्यात चित्रविचित्र आवाज येत असतील तर तुमचा फोन टॅप केला जात असल्याची ती लक्षणे आहेत.

संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’  या सदरामधील लेख – राजेंद्र येवलेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

No posts found.
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..