मिटून-मिटुन पाकळी, फुला रे, आता तरी पड खाली
तो बघ तिकडे सूर्य मावळे
तुझेही तसेच केसर पिंकले
कर जागा मोकळी, फुला रे, मिटुन पड खाली ॥
सकाळची रुसली उषा
गाढवा बघ आली निशा
चढली रात्रीलाही काजळी, फुला रे, मीट आता पाकळी ॥
सुगंध तुझा पसरलेला
जाण, हा पुरा ओसरला
का तरीही जागा व्यापली फुला रे आता मिटुन पड खाली ॥
तुझ्यातले अन् काव्य सरकले
ते बघ तुझे म्हातारपण आले
ओळख तू ही स्थिती मुळी, फुला रे, खाली मिटुन पड पाकळी ॥
(शालेय अभ्यासक्रमातील कवी देशपांडेंची कविता प्रस्तुत कवितेची स्फूर्ती आहे.)
-यतीन सामंत
Leave a Reply