काल कालच्या काळामध्ये,
कलून पडला असा कसा?
भाव भावनांच्या लगोरिमध्ये,
रडत बसला ढसा-ढसा !!
भुत-भविष्य तुला न कळती,
स्व कुशीत निजलास कसा?
कोळ्याच्या जाळ्यात अडकुनी,
तडफड करसी, जणु तू मासा !!
दवबिंदूंचा पडता सडा अंगणी,
तव चुंबन घेता थेट सूर्या,
नव ध्येय अन् उम्मेदिने,
रूप हिरा चे लाभे तया !!
कुंभार तू तुझ्या जीवनाचा,
शिल्प घडवण्या हो स्तब्द जरा,
योग्य वेळ पाहुनी,
डाव आयुष्याचा साध, मर्द गड्या!!
– श्र्वेता संकपाळ.