नवीन लेखन...

फोटोग्राफी मदतीची

जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात काही अत्यावश्यक सेवा सोडल्या तर लॉकडाऊन च्या रूपाने बहुतांश भारतीयांना घरात बंदिस्त करून ठेवले आहे. या लॉकडाऊन च्या निमित्ताने अनेकांची आर्थिक घडी पार विस्कटून गेली आहे.

ज्यांचे पोट दररोजच्या हाताच्या कसरती वर अवलंबून आहे अशा लोकांसमोर सध्या जगण्या-मरण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत हाताला रोजगार होता तोपर्यंत स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पोटाला दोन वेळ अन्न तरी मिळत असे. पण लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर सर्व व्यवहार थांबले आणि अनेकांच्या हात आणि पोटातील अंतर वाढायला लागले.

पण जेव्हा मानव जातीवर कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटे येऊ लागतात तेव्हा मानवतेच्या रूपाने अनेक हात देखील मदतीला धावून येतात. आज अनेक स्वयंसेवी संस्थांनी फक्त मानवता हाच धर्म मानून अनेकांची पोट भरण्यासाठी अन्नदानाचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांनी सुरू केलेले हे मानवतेचे कार्य इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे आपल्यापर्यंत रोज पोहोचतच आहे.

पण असे म्हणतात की डाव्या हाताने केलेले दान हे उजव्या हाताला देखील कधी माहित होऊ नये. दान हे नेहमी गुप्त असावे. पण मला वाटते दान गुप्त असावे यापेक्षा ते प्रेरणा देणारे असावे. त्यामुळे अन्नदान असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मानवतेला मदत करणारे दान असो त्याचा प्रचार, प्रसार करणे मला अगदीच चुकीचे वाटत नाही. पण काही जणांना मदतीला धावणाऱ्या अशा हातांची फोटोग्राफी किंवा प्रचार-प्रसार करण्यावर तीव्र आपत्ती असते. त्यांच्यामते अशी फोटोग्राफी मानवतेसाठी नाही तर स्व प्रसिद्धीसाठी असते. काही प्रमाणात हे खरे असेलही. पण मदतीला धावणाऱ्या अशा कित्येक हातांचा उद्देश मानवतेचा असो किंवा स्व प्रसिद्धीचा असो, त्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा आपल्याला प्रेरणा मिळून आपले हात मदतीसाठी पुढे सरसावतात का हा प्रश्न मला जास्त महत्वाचा वाटतो.

असे म्हणतात की पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून पुस्तकाच्या पानाबद्दल निष्कर्ष काढू नये. मुखपृष्ठ आपल्याला फक्त विषयाची ओळख करून देतो पण आत मधील पाने विषय किती खोल आहे याची जाण करून देतात. त्यामुळे काही स्वयंसेवी संस्था कोरोणा रुपी संकटाच्या कठीण काळात गरिबांसाठी मदतीचा हात पुढे करून जर त्याचा फोटोग्राफीच्या रूपाने प्रचार-प्रसार करत असतील तर त्या बद्दल लगेच आपत्ती वाटण्याचे काही कारण नाही. असे फोटो फक्त प्रसिद्धी साठी न्हवे तर तुम्हाला मदतीचे आवाहन करण्यासाठी पण असु शकतात. प्रत्येक्षातील गरजवंताचा आकडा हा फोटो मध्ये मदत होत असलेल्या गरजू पेक्षा खूप मोठा असू शकतो. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांना गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करताना अजून काही हात त्यांना जोडले जाणे अपेक्षित असेल तर त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार होणे किंवा तो करावा लागणे हे स्वाभाविक आहे.

मी एक गोष्ट अजून नमूद करू इच्छितो की ज्यांच्यामध्ये माणसे ओळखण्याची कला असते त्यांच्यामध्ये मदतीला सरसावणारे हात प्रसिद्धी साठी आहे की मानवतेसाठी हे ओळखण्याची देखील कला असते. त्यामुळे अशी मदतीची फोटोग्राफी बघितल्यावर सर्वांना एकाच तराजूत तोलणे योग्य नाही. आपल्या सदसद विवेक बुद्धीला प्रेरणादायी वाटणारे कुठलेही दान बघितल्यावर आपला मदतीचा हात पुढे करायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जे हात प्रामाणिकपणे आधीच मदतीसाठी पुढे सरसावले आहेत त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही किमान एव्हढी तरी काळजी प्रत्येकाने नक्कीच घेतली पाहिजे.

लेखक : राहुल बोर्डे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..