फूल उमलताना,
त्याकडे बघत रहावे,
सावकाश उघडतानां,
पाकळी पाकळी हाले,–!!!
सुरेख पहा रंगसंगती,–
सुबक अगदी ठेवण,
आकार प्रफुल्ल होताना,
आनंदित आपले मन,–!!!
वाऱ्यावर झुलताना,
कळ कुठली कोण दाबे,
अचानक फुलाची पाकळी,
आतून उत्फुल्ल होऊ लागे–!!!
हालचाल होताना तिची,
नाजूक परागकण दिसती, उघडझाप त्यांची पाहता,
आपले नेत्र सुखावती,
फांदीवरची अनेक फुले,
आतून कशी हालती,
जाईचे निरीक्षण करावे,
स्वर्गीय आनंद भोवती,–!!!
मंद मंद सुगंध,
फुलाफुलातून येऊ लागे,
पाकळी नि पाकळी,
चट्शिरी खुलू पाहे,–!!!
आखीव रेखीव नक्षी,
दिसे प्रत्येक फुलावरी,
फुलांचे घोस नव्हे ,
आता फुलांचीच मातब्बरी–!!!
मनमोहक रंगसंगती,
डोळेफोड असे किती,
नका रे फुलांना कुस्करू,
ती कळीच ना शेवटी,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply