फुलंही बोलतात
अवखळ जराशी,
हितगुज त्यांचे
सांगतात मनाशी…
व्यथा,वेदना साऱ्या
फुलांनाही असती,
सांगतात हळुवार
वेदनेची कहाणी…
अबोल कथा त्यांच्या
अलवार ऐकाव्या,
नाजूक हातांनी मग
गुज गप्पा कराव्या…
फुलं बोलतात ? प्रश्न पडेल जरासा वेडेपणा वाटेल…पण फुलं बोलतात.. त्यांच्याशी एकदा जीव लावा… काय देत नाही फुलं आपल्याला?
फुलांच्या गंधाने रोमारोमात भावना मोहरतात.. रंगाने डोळ्यांना सुखद भाव देतात.. फुलांच्या अस्तित्वाने मनात मोहर फुलतात.. फुलांच्या बागेत जा कधी… त्यातील चेतना, प्रेरणा, उत्साह नक्कीच आपल्या लहरीत तेजोवलय निर्माण करतात…
फुलं जी माणसांना आनंद देतात… फुलांमध्ये रमून तर बघा.. तुम्हाला फक्त आणि फक्त आनंदाची अनुभूती वादातीत मिळेल….
फुलांचा मोहरणारा गंध मन:स्पर्शी असतो…. आपल्या मनातील खळबळ या साऱ्या मोहक फुलात मिटून जाते….
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply