नवीन लेखन...

लघु कथा – पिंपळ आणि आत्महत्या करणारा

पुन्हा बारावीत तो नापास झाला. जो मुलगा बारावी पास करू शकत नाही तो आयुष्यात काय करणार? फुकटचे किती दिवस खाऊ घालायचे तुला? तू जगला नि मेला काय, आम्हाला सारखेच. वडिलांचे कटु बोल राहून-राहून त्याला टोचत होते. मनात विचारांचे काहूर उठले होते. आपण एक साधी परीक्षा हि पास करू शकत नाही. व्यर्थ आहे असे जगणे. आपण मेलो तर निदान घरात एक खाणारा कमी होईल. भावनेच्या आवेशात त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला.

गावा जवळच्या डोंगराच्या कड्यावरून कधी-काळी कैद्यांना कडेलोट केले जायचे, त्या डोंगराच्या कड्यावर पोहचल्यावर त्याने कड्यावरून खाली बघितले. इथून उडी मारली तर आपण नक्की मरणार ना, खात्री करण्यासाठी त्याने खाली वाकून बघितले. पण हे काय, कड्याच्या थोड्या खालीच दोन दगडांच्या भेगेतून एक पिंपळाचे झाड डोकावात होते. झाडाच्या मुळांनी दूर पर्यंत दगडांना जखडून ठेवले होते. पिंपळाचे ते झाड गुरुत्वाकर्षणच्या नियमाला झुगारून वार्यासवे मस्त डोलत होते. च्यायला, इथून उडी मारली तर आपण कदाचित पिंपळाच्या झाडात अटकू. सहज त्याच्या मनात विचार आला, इथे न माती न पाणी, फक्त दगडाची एक भेग, तरी हि दगडांना धरून हे झाड जिवंत आहे.

आधारासाठी मातीच्या जागी दगड मिळाले तरी पिंपळाने तक्रार केली नाही. जगण्याशी आशा हि सोडली नाही. दगडातच त्याने जगण्याच्या मार्ग शोधला, दगडातूनच जीवनसत्व घेतले. आपल्या डोक्यावर तर छत आहे, घरात खायला हि मिळते. फक्त परीक्षेत नापास झालो म्हणून आत्महत्या? मनात विचारचक्र सुरु झाले. जर दगडाच्या आधारावर पिंपळ जगू शकू शकतो तर आपण हि स्वावलंबी होऊन जगू शकतो. आपण आत्महत्या केली तर आई वडिलांना किती दु:ख होईल. शाळेत नापास झालो तरी काय झाले, आपल्याला हि पिंपळाप्रमाणे जगण्याचा काही ना काही मार्ग निश्चित सापडेल. त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि घरी परतला. नव्या जोमाने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..