पिंगाली वेंकय्या.. हे नाव फारसे कुणाला माहीत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती याच पिंगाली वेंकय्या यांनी. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी झाला. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते. मछलीपट्टनममध्ये माध्यमिक शिक्षण पुर्ण करुन पिंगली वेंकय्या पुढील शिक्षणासाठी कोलंबोला गेले. भारतात परत आल्यावर प्रथम त्यांनी एका रेल्वे गार्डची नौकरी व नंतर बेल्लोरीमधे सरकारी नौकरी केली. तदनंतर त्यांनी एंग्लो वैदिकीय महाविद्यालयात उर्दु आणि जापानी भाषेच्या अभ्यासाकिरता लाहोर गाठले.
वेंकय्या यांना ब-याच विषयांची ज्ञानप्राप्ती केलेली. त्यापैकी भुविज्ञान आणि कृषीक्षेत्राशी जास्त लगाव होता. तसेच ते हि-यांच्या खदानीत विशेषज्ञ देखील होते. वेंकय्या यांनी ब्रिटीश भारतीय सेनेमध्ये पण नोकरी केली होती आणि एंग्लो-बोअर युद्धामध्ये पण ते सहभागी झाले होते. त्याच काळात ते गांधीजींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले.
१९०६ ते १९११ पर्यंत वेंकय्या कापसाच्या वेगवेगळ्या प्रकारंच्या अभ्यासात मग्न झाले. आणि त्यांनी बॉम्वोलार्ट कंबाडीया प्रकारच्या कापसावर एक अध्ययन देखील प्रकाशीत केलं. आणि त्यावरुन वेंकय्या हे कपास वेंकय्या म्हणुन प्रसिद्ध झाले. काकीनाडा मध्ये आयोजीत केलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आयोजीत अधिवेशना दरम्यान भारताचा स्वतःचा राष्ट्रध्वजाची आवश्यकता यावर भर दिला आणि त्यांचे हे विचार गांधीजीना पटला. मग गांधीजीनींच त्या राष्ट्रध्वजाची रचना करण्यास सुचवले. त्यांनंतर १९१६ ते १९२१ पर्यंत वेंकय्या यांनी तब्बल पाच वर्षे विविध ३० देशांच्या राष्ट्रध्वजाचा अभ्यास केला आणि नंतर तिरंग्याचा विचार केला.
१९२१ साली विजवाडा येथे आयोजीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या अधिवेशनात महात्मा गांधीना त्यानी बनवलेल्या हिरव्या आणि लाल रंगाचा ध्वज दाखवला व त्यापुढे प्रत्येक अधिवेशनात हा द्विरंगाचा ध्वज वापरला जात होता. पण त्यावेळी अधिकारीकरित्या कॉंग्रेसकडुन या झेंड्याला मान्यता मिळाली नाही.
यादरम्यान जालंधरच्या हंसराज यांनी झेंड्यामध्ये चक्रीय चिन्हाचा समावेश करण्याचा सुझाव दिला. या चक्राला सामान्य माणुस व प्रगतीच्या रुपात पाहिलं जात होतं.
नंतर गांधीजीच्या सुचवलेल्या विचारानुसार शांतीचे प्रतिक मानलं जाणा-या पांढ-या रंगाचा समावेश देखील त्यामध्ये करण्यात आला. पुढे १९३१ मध्ये केशरी, हिरवा आणि पांढ-या रंगाच्या तिरंगा ध्वजास कॉंग्रेसने कराचीमध्ये आयोजीत अखिल भारतीय सम्मेलनामध्ये सर्वसम्मतीने स्विकारीत केल. नंतर ध्वजामध्ये असलेल्या चरख्याची जागा अशोकचक्रानी घेतली.
पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ संजय पेठे
Leave a Reply