नवीन लेखन...

बॉनसायसाठी रोपे

बॉनसाय तयार करण्याच्या दोन मुख्य पायर्‍या आहेत. पहिली पायरी म्हणजे निवडलेले रोप बॉनसाय बनवण्यासाठी तयार करणे आणि दुसरी पायरी म्हणजे बॉनसाय बनवणे.

बॉनसायसाठी रोप निवडल्यानंतर प्रथम रोपाची, फांद्याची उंची आपल्याला हवी तेवढी कमी केली जाते. तसेच नको असलेल्या जादा फांद्या मुख्य खोडापासून काढून टाकतात. रोपाला दोन प्रकारची मुळे असतात. सोटमूळ जाड असते. ते सरळ खालच्या दिशेने वाढते. तंतूमुळे धाग्यांप्रमाणे असतात. ती जमिनीला समातंर पसरतात. सोटमूळ कापून टाकले जाते. त्यासाठी तंतूमुळे जास्त प्रमाणात वाढण्यास मदत होते. असे रोप मातीच्या कुंडीमध्ये लावले जाते. त्यासाठी चांगल्या प्रतीची माती, वाळू आणि चांगले कुजलेले शेणकत किंवा गांडूळखत समप्रमाणात एकत्र करतात. कुंडीच्या तळाशी विटांचे तुकडे अथवा छोटे दगड टाकतात त्यावरती दोन-तीन इंच जाडसर वाळूचा थर घालतात.

रोपे लावताना तंतूमुळे रोपाच्या बाजूने पसरतील, हे पाहून रोप कुंडीमध्ये लावतात. या रोपाची बागेतील इतर रोपांप्रामणेच काळजी घेतात. म्हणजेच, वेळच्या वेळी पाणी, खते, औषधफवारणी हे सर्व सांभाळतात. आपल्याला हव्या त्या जाडीच्या फाद्या, हव्या त्या आकाराचे, रचनेचे झाड तयार होईपर्यंत झाड कुंडीतच वाढवतात. त्यासाठी वेळोवेळी जादा फूट छाटणे, शेंडे कापणे, नवीन वाढणार्‍या फांद्या काढणे, जादा पाने कापून टाकणे अशी कामे करावी लागतात. तसेच बर्‍याचदा पावसाळ्यात जाड मूळे छाटून झाड परत मोठ्या कुंडीत लावावे लागते.

आपण ठरवलेल्या रचनेप्रमाणे झाडाचा आकार बनवण्यासाठी वायरिंग करतात. त्यासाठी तांबे किंवा अॅल्युमिनिअमची लवचिक तार वापरातात. तार गुंडाळताना बुंध्याच्या खालच्या भागाकडून सुरुवात करुन फांदीच्या वरच्या टोकपर्यत तिरकास पीळ पडेल, या पध्दतीने सर्व फांद्याना तार गुंडाळतात. तार गुंढाळताना मध्ये येणारी पाने कढून टाकतात एकदा तार गुंडाळून झाली म्हणजे रचनेप्रमाणे फांद्या वर, खाली, तिरकस हलवता येतात.

आपल्याला हव्या त्या रचनेप्रमाणे झाड तयार झाले म्हणजे ते बॉनसाय ट्रेमध्ये लावले जाते.

— मानसी भिर्डीकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..