प्लास्टिक हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, त्यामुळे त्याच्यापासून सुटका नाही. प्लास्टिकमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या तसेच यूज अँड थ्रो साधनांना चालना मिळाली.
प्लास्टिक हा बहुलक म्हणजे पॉलिमरचा मोठा रेणू असतो व त्यात अर्थ एकच रासायनिक रचना असलेल्या मोनोमर्सच्या तुकड्यांची पुनरावृत्ती असते. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू यांच्यापासून प्लास्टिकला आवश्यक असलेले घटक मिळवलेले असतात. प्लास्टिकमध्ये कुठलीही गोष्ट साठवून ठेवली, तरी प्लास्टिक किंवा साठवलेल्या पदार्थावर काही परिणाम होत नाही.
उष्णता व पाणी यांच्यातही टिकाव धरू शकेल अशा पदार्थाचा शोध घेतला जात असताना अॅलेक्झांडर पारकेस यांनी प्रथम १८५५ मध्ये प्लास्टिक तयार केले. सेल्युलॉइडचे संश्लेषण करून त्यांनी हे प्लास्टिक मिळवले होते. पहिल्यांदा प्लास्टिकचा वापर हा फोटोग्राफिक फिल्ममध्ये करण्यात आला. त्यानंतर १९०९ मध्ये खरे प्लास्टिक हे लिओ बेकेलँड यांनी बेकेलाइटपासून तयार केले. पहिल्या महायुद्धाच्या काळात प्लास्टिकवर अधिक संशोधन होऊन पॉलिस्टरीन व पॉलिव्हिनायल क्लोराइड म्हणजे पीव्हीसी तयार करण्यात आले. १९३० च्या सुमारास नायलॉनचा शोध लागला.
१९५० मध्ये प्लास्टिक फार लोकप्रिय खेळण्यांपासून अंतराळयानापर्यंत उपयोग वाढला. प्लास्टिकचे ते त्याचा थर्मोसेटिंग व थर्मोप्लास्टिक असे दोन प्रकार असतात. थमोंसेटिंग प्लास्टिकमध्ये एखादा आकार तयार केला व ती वस्तू थंड केली, की तिचा आकार परत बदलत नाही, पुन्हा उष्णता दिली तरी आकार बदलता येत नाही. थर्मोप्लास्टिकमध्ये पुन्हा उष्णता देऊन आकार बदलता येतो. पॉलिथिलिन टेरेफथॅलेट या प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. पॉलिस्टेरीनचा वापर फर्निचर, टीव्ही, कॉम्प्युटर, भांडी यात करतात. पॉलिव्हिनायल क्लोराइडचा वापर पाइप तयार करण्यासाठी होतो. पॉलिटेट्राफ्लुरोइथिलिन म्हणजे टेफ्लॉनचा वापर कुकवेअर व वॉरप्रूफिंगसाठी केला जातो. पॉलिएथिलिनचा वापर शॉपिंग बॅग्जसाठी करतात.
पॉलिप्रॉपलिनचा वापर वाहनांचे भाग तयार करण्यासाठी करतात. सीडी, चष्मे यासाठी पॉलिकार्बोनेट वापरतात, पॉलियुरेथिनचा उपयोग संरक्षक आवरणे तयार करण्यासाठी होतो. प्लास्टिकचे नैसर्गिक विघटन अत्यंत मंद गतीने होते, त्यामुळे पर्यावरणास हानिकारक आहे. १९५० पासून असे हजारो टन प्लास्टिक पर्यावरणात फिरत आहे. बांगलादेशने प्रथम प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली. भारतातही अनेक शहरात तसेच पर्यटन स्थळी प्लास्टिक पिशव्यांना बंदी आहे.
हिमाचल प्रदेशात अशा प्रकारे पहिल्यांदा बंदी घालण्यात आली होती. प्लास्टिकच्या पिशव्यांनी अनेकदा पुराचे पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे बांगला देशात संकट निर्माण झाले होते. फेरवापर करता येईल असे प्लास्टिक वापरणे हा त्यावरचा एक उपाय आहे व पर्यावरणस्नेही असे जैवविघटनशील प्लास्टिक तयार करण्यातही यश आले आहे.
Leave a Reply