१९९० च्या मध्यापर्यत एक गोष्ट आपल्या सर्वाच्याच जवळची होती किंबहुना ती प्रत्येक लहान-मोठ्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली, ती म्हणजे मैदानी खेळ; या खेळांमुळे बर्याच अशी मुला-मुलीचं व्यक्तीमत्व घडलं आणि आत्मविश्वास वाढीस लागला. आज २१व्या शतकात काही मैदानी खेळ पार हद्दपार झाले असून त्याची जागा “व्हिडिओ गेम्स आणि आधुनिक तंत्रज्ञानानी घेतली आहे पूर्वीचे काही खेळ आठवन पहा; -“लगोरी दगड का माती लपवा छपवी आंधळी कोशिबीर आट्यापाट्या विटीदाडू गोट्या आबादुबी यादी आणखीन वाढणारी आहे आज काळाच्या ओघात हे खेळ कोणी खेळतानाच दिसत नाही बर्याच जणांना तर याची नावे देखील माहित नसतील साहजिक आहे म्हणा मुलं इतकी त्यांच्या शालेय विश्र्वात आणि इतर कामांमध्ये व्यग्र झालेली आहेत की असे खेळ म्हणजे त्याच्यासाठी दूरपर्यत मागमूस देखील नाही असो. पण या खेळांची गंमत आणि मज्जा काही औरच होती; म्हणजे रविवार किंवा सुट्टीचे दिवस असले की याची आखणी ठरलेली असायची कुठली मुलं कोणत्या टीम मध्ये असणार एखादा लहानगा असेल तर त्याला लिंबू-टिंबु चं स्थान असे वयानी मोठी असलेली मुलं कॅप्टन असं जवळपास सारखच चित्र या खेळांमध्ये असे यातील बरचसे खेळ घराच्या अंगणात किंवा इमारतीच्या मोकळ्या मैदानात खेळले जात.आज मितीला इमारतीमध्ये खेळायला तर सोडाच पण वाहनांच्या पार्किंगसाठी देखील जागा नसते; मे महिन्याची,दिवाळी अन् नाताळची सुट्टी म्हणजे त्याकाळच्या बच्चेकंपनी साठी या खेळाच्या दृष्टीने पर्वणीच असायची आणि अनेक स्पर्धाचं आयोजन देखील यावेळी केलं जायच; क्रिकेटचा बोलबाला तर तेव्हा ही होता आणि आजदेखील टिकून आहे पण इतर खेळांचा वरचष्मा अधिक असायचा.
मुलींसाठी सुध्दा काही खेळ राखीव होते जसे की लंगडी“पकडा पकडी, “भातुकली“ सागरगोटे इत्यादी म्हणजे चारजणी एकत्रित जमल्या की अश्या खेळाचा फड “हमखास रंगत. असे खेळ आजकाळ कोणी खेळताना दिसत नाही, खेळाच्या निमित्ताने लहान मुलांचा होणारा गोंगाट देखील कमी झालायं. कारण लहान मुलं बोटांच्या सहाय्याने डिजिटल गेम्स खेळात, पण त्यामध्ये सच्चाईचा कोणताच थारा नसतो, कशासाठी आपण खेळतोय आपल्याला यामधून काय साध्य करायचं आहे हे सांगण्यासाठी सुद्धा जाणकार व्यक्ती नसते, कारण प्रत्येक व्यक्ती आपापल्या कार्यक्षेत्रात मग्न झालेली दिसते आहे. पण मैदानी खेळांचं महत्त्व आणि अनावश्यक खेळांना अवास्तव महत्त्व दिल्यामुळे मुलांचं बालपण हरवण्याची भीती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे जुन्या खेळांचं महत्त्व ओळखून अनेक मॉल्स मध्ये “प्ले एरिया” उभे राहून खेळाचं अर्थकारण तेजीत आलं आहे; पण या खेळांचं ट्रेनिंग खरंतर पालकांकडून मिळणं अपेक्षित आहे. पण खेळच माहित नसतील तर त्याचं महत्त्व आणि माहिती तरी कोणी देणार? आज जर मोठ्या शहराबाहेर, खेड्यात किंवा लहान पाड्यात फिरण्याचा योग आला तर अनेक मुलं जुने खेळ खेळताना दिसतात; एखादी पसतीशी ओलांडलेली व्यक्ती जेव्हा असे खेळ पाहते तेव्हा ती नकळतच आपल्या बालपणीच्या मैदानी खेळात रमून जाते.
— सागर मालाडकर
Leave a Reply