नवीन लेखन...

कवी, गीतकार प्रवीण दवणे

(भाग २)

प्रवीण दवणेचे दोन महत्वाचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले , त्यापैकी एकाचे प्रकाशन दुबईमध्ये झाले. ‘ आमी ‘ नावाची आखाती देशांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांनी मिळून पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा दुबईत झाला होता तो समारंभ मागच्या वर्षी झाला होता आधीच सागतो .,तेथे प्रवीण दवणेचा ‘ नवी कोरी सांज या मराठी कविता संग्रहाचे प्रकाशन झाले , त्या कवितांचे वाचन तिथे झाले तेव्हा सर्व जणांनी त्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्याचे अध्यक्षपद प्रवीण दवणे यांच्याकडे होते. आत्तापर्यंत त्याची जवळजवळ प्रवीणची ८० पुस्तके प्रकाशित झाली आणि त्याच्या किती आवृत्त्या निघाल्या हे तो जाणे आणि त्याचे प्रकाशक जाणे. प्रवीण दवणेची पुस्तके महाराष्ट्रभर पसरली आहेत, अन्य राज्यातही आणि परदेशातही . आता प्रकाशित नुकतीच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह धरून ऐकून १५ कवितांची पुस्तके प्रकाशित झाली. ‘ नव्या निरभ्रासाठी ‘ आधी झाला त्यानंतर एक कोरी सांज ‘ हे ते दोन काव्यसंग्रह . त्यामध्ये मला ‘ ध्यानस्थ ‘ नंतरचा प्रवीण दवणे सापडला. प्रवीण दवणेने विपुल साहित्य लिहिले परंतु प्रवीण मुळचा ‘ कवीच ‘ म्हणावा लागेल. त्यावेळी दुबईच्या या कार्यक्रमात सुमारे हजार-बाराशे जण होते. सगळ्यानी त्याच्या तिथल्या त्या कवितांच्या काव्यवाचनाला भरभरून प्रतिसाद दिला , कवितेच्या कार्यक्रमाला इतके जण येणे आणि ते देशाबाहेर म्हणजे काहीतरीच म्हणावे लागेल .आपल्याल्या इथे कवीला लोकांना बांधून ठेवण्यासाठी काय काय करावे लागते हे न सागू लागे , असेच म्हणावे लागेल.

माडगुळकर , खेबुडकर, नांदगावकर …इथून ही खरी कवीची वेगळी परंपरा सुरु झाली कारण त्यात गीतकार ही पण उपाधी जोडली गेली. चित्रपटासाठी गीत लिहितो म्हटल्यावर कवी कुळाला बट्टा लागला की काय अशी भावना निर्माण झाली आणि यांना कवी म्हणावे का नाही यावर चर्चा झडल्या असतील. पण सर्वजण याला पुरून उरले, ते ज्या ज्या माध्यमात गेले तेथे अग्रेसर झाले. कवीचे कंपू भले त्यांना कवी मानणार नाहीत , पण जनतेने त्यांना आधीच कवीपण आणि गीतकारपण बहाल केले, प्रवीण दवणे त्यातील एक म्हणावा लागेल , कुसुमाग्रज, बोरकर ,पाडगावकर याचा आणि अनेक श्रेष्ठ कवींचा शब्दावारसा पुढे नेणारा ठरला आहे हे या दोन कवितांच्या पुस्तकामुळे आज जाणवले. कुठेतरी प्रवीण कुसुमाग्रज याच्या पाउलवाटेने जात आहे, असे जाणवते नाही ते खरेच आहे. त्यापैकी ‘ एक कोरी सांज ‘ मध्ये तो प्रेमकविताच्या माध्यमातून अधिक अधिक आर्त होताना तो दिसतो. तो म्हणतो ,

‘ पुन्हा एक कोरी सांज
पायाशी फेकून
निघून गेलास ,सवयीनं –
मी
शाईत विरघळत राहिले
आकाश होईपर्यंत ..

ह्यात मला ध्यानस्थ नंतरचा प्रवीण दवणे दिसला. अशा अनेक कविता या पुस्तकात आहेत , वाचताना त्या पटकन संपतात पण आशय मात्र मनात रेगाळातच राहतो. गीतकार म्हणून ठप्पा बसला की तो बसतो , परंतु तो मुळचा कवी असतो हे विसरता कामा नये. अर्थात ज्यांना जमत नसते ते मग अशी नावे ठेवतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रवीणने सुमारे ४,५०० गीते लिहिली. पण कुठे बिभत्सपणा नाही. मला आठवत आहे एकदा मी पिंपरीला रस्त्यावरून चाललो होतो. समोरून एक बाई , एक बुवा प्रवीणचे दत्ताची पालखी हे गाणे म्हणत , रस्त्याने जात होते , लोक त्यांना पैसे देत होते , ते पुढे जाताना मी त्याच्या हातावर रुपया ठेवला आणि म्हणालो काका तुम्ही हे दत्ताची पालखी कोणाचे गाणं म्हणता तशी तो म्हणाला , हा अभंग आहे , मी म्हणालो कुणाचा , तशी तो म्हणाला आहे पारंपारिक …आणि तो पुढे चालू लागला . मी विचार करू लागलो एखादे गाणे कवीच्या जिवंतपणीच पारंपारिक व्हावे, यात मोठे सुख नाही. विठ्ठल वाघ यांची ‘ काळ्या मातीत मातीत काय ‘ किवा रमेश अणावकर यांचे ‘ केशवा माधवा काय ‘ ही गीते , चागली कविता ही अशीच असते समाजात आणि मनात कधी विरघळते हे कळतच नाही . ट्रेनमध्ये अणावकरांचे ‘ केशवा माधवा ‘ हे गाणे किती प्रकारे मोडतोड करून म्हटले जाते, हे जर अणावकरांचे आईकले असते तर त्यांना किती झटके बसले असते याचा नेम नाही. प्रवीण दवणेची ही कविता ह्याच पंथातली आहे.त्यातील दुसरी कविता तर जबरदस्तच आहे…

मनातल्या मनातलं ,
एक गाव ;
वसती
फक्त दोघांचीच…!
विसावताना,
एकमेकात ;
चाहूल
पहाटरेघेचीच ..!

ह्या अशा प्रेमकविता ह्या कविता ह्या संग्रहात आहेत. प्रत्येक कविता प्रवीण दवणे मधील आतला दडलेला आर्त कवी दाखवतात. आज गेयकविता लिहिणे किवा आर्त कविता लिहिणे अस्त पावत आहे कारण वास्तवाच्या नावाखाली सर्व काही मारले जात आहे असे अनेकांचे मत आहे. गेय कविता लिहिणे साधे काम नाही , ज्यांना जमत नाही मग ते मात्र अशी हाकाटी करतात , गेय कविता कविताच नाही. प्रवीणने अनेक शेकडो गेय कविता , गाणी लिहिली कारण तो कवी आहे आणि तुम्ही जे काही वास्तव म्हणता ते पण तो उत्तम लिहू शकतो , कारण तो उत्तम प्रतिभेचा कवी आहे. आधी उत्तम प्रतिभा असणे आवश्यक असते. त्याचा प्रत्यय प्रवीणच्या या दुसऱ्या काव्यसंग्रहात आला आहे.

‘ नव्या निरभ्रासाठी …’ ह्या काव्यसग्रहात तो एका कवितेत म्हणतो ,
‘ माती शांतपणे
वर सरकत जाते
बीजातून
देठातून
पुन्हा आकाशापर्यंत !
आकाश
झेपावत रहाते तृषेतून
क्षुधेतून
पुन्हा मातीपर्यंत …!

कविता म्हणजे काय असते ते अशा कवितांमधून दिसते , जाणवते. माणसाच्या माणुसकीचा प्रवास हा असाच असतो विध्वसंक कधीच नसतो , समाजाचे शोषण होत असते , ते तर विविध प्रकारच्या साहित्यातून आलेच पाहिजे, आणि तेच खरे साहित्य असते असा भ्रम असेल तर तो काढून टाकलाच पाहिजे. कारण जग जसे विद्रूप , विकृत असते तसे सुंदरही असते, कवि कुठलाही असो , त्याला स्वप्नरंजन आणि वास्तव याचे भान असतेच असते , प्रवीण दवणे याच पठडीमधील आहेत हे त्यांच्या ह्या दोन काव्यसग्रहा वरून जाणवते , अर्थात त्यांच्या कवितेला सामाजिक भान होते हे वेळोवेळी दिसून आले होते ,आज ह्या निमिताने ते प्रकर्षाने दिसून आले हे महत्वाचे.

अशा अनेक कविता प्रवीण दवणे यांनी लिहिल्या दुर्देवाने का सुदैवाने तो कुठल्याही कंपूत सामील झाला नाही हे महत्वाचे .

आजही त्याचा कार्यक्रम झाला की तो तिथून निघतो , नंतरचा अंक नसतो , म्हणून संयोजकांना तो परवडतो. पाकीट घेतले, झोळी घेतली की निघाला इतका प्रक्टिकल .

कार्यक्रम झाला आता ‘ बसू ‘ हा सर्वमान्य प्रकार त्याच्या आयुष्यात नाही , कारण तो कधीच स्वतःला ‘ संपवणारी ‘ कामे करत नाही . तो तसे करत नाही म्हणून तो आजही भरपूर लिहितो, टीकाकार काहीही बोलो त्याला काहीही फरक पडत नाही , फरक टीकाकार यांनाच पडतो कारण त्याच्यावर जळण्यातच त्यांची शक्ती खर्च होते

अशा प्रवीण दवणेचा आज वाढदिवस आहे

मला वाटत अजून त्याच्याकडून बरेच काही वेगळे लिहिले जाईल असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आज ज्या शेकडो लोकांनी माझ्या लेखाला प्रतिसाद दिला तो खरा प्रतिसाद त्याच्या आतापर्यंतच्या लेखाला आहे मी फक्त शब्द जुळवले.त्यांनी एक गोष्ट आयुष्यात केली ती मी आज सांगणार आहे , ते माझे निरीक्षण आहे , कदाचित तुमचेही असेल प्रवीणने कधी दुसऱ्याची रेष ‘ पुसण्यात ‘ त्याची ताकद खर्च केली नाही तर त्याने त्याची संपूर्ण ताकद आणि बुद्धिमत्ता स्वतःची वेगळी मोठी करण्यात ताकद वापरली. हे करता करता त्याला त्रास झळा असणार, जवळच्यांचे घाव सहन करावे लागले असणारच

काळ पुढे जातच असतो, जाताजाता बरेच काही घेऊन जातो, त्याची उणीव आयुष्यभर भासते. प्रवीण मात्र त्याचे काम करत आहे, सगळ्यांना तोड देत …नवनिर्मितीची आस धरून.

प्रवीण… हॅप्पी बर्थडे ‘

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..