सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणार्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन काढतील
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
– मंगेश पाडगावकर/१९७५.
ही कविता लिहून मंगेश पाडगांवकर यांनी सरकारचा रोष ओढवून घेतला होता.
विंदा नेहमी म्हणत असत काही कविता ह्या मृत झाल्या पाहिजेत, मरणे आवश्यक असते नवीन काळात त्या कालबाह्य होणे आवश्यक असते परंतु दुर्देवाने काही घटना काही गोष्टी नष्ट होतं नाही. मलाही तसेच वाटते ही कविता म्हणजे एक शाप आहे?
लहानपणापासून वसंत बापट,विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगांवकर यांच्या कविता ऐकत होतो त्या कविताच ऐकत मोठे झालो.
मंगेश पाडगांवकर यांच्या काही कविता, गीते अमर आहेत, त्याचे भातुकलीच्या खेळामधली राजा राणी हे गाणे तर मला वेगळे गूढ वाटते ते त्यांच्या मानसिक अवस्थेचे.
त्यांची असंख्य गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply