नारायण सुर्वे म्हणजेच नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी मुंबईत झाला. जन्मानंतरच परिस्थितीशी झुंज त्याची खरी तर सुरु झाली होती. शिक्षण जेमतेमच होते. झोपण्यासाठी छत नव्हते का पोटाला अन्न नव्हते. तरीपण त्यांनी प्रथम स्वतःलाच शिकवले, वाचायला-लिहावयाला शिकले.
१९५२ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा त्याच्या पत्नीला स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागले. मास्तर आणि त्याच्या पत्नी कृष्णाबाई ह्याचे नाते इतके घट्ट होते की त्यात ते निर्जीव मंगलसूत्र नसले तरी चालले.
त्याकाळी त्याच्या पत्नीने घेतलेला निर्णय खरंच वेगळाच होता. क्रन्तिकारी होता कारण त्याच काव्यसंग्रहामुळे ‘सुर्वे मास्तर’ हे खऱ्याअर्थाने कवी म्ह्णून जगाला कळले.
कवि कुसुमाग्रज नारायण सुर्वे याच्याबद्दल म्हणताना असे म्हणतात की, “नारायण सुर्वे यांच्या कवितेने पुस्तकांच्या कपाटात आपली स्फुर्तीस्थाने शोधली नाहीत.”
त्यानंतर आलेल्या ‘माझे विद्यापीठ’ ह्या पुस्तकाला ११ पुरस्कार मिळाले. त्याच्यावर कार्ल मार्क्सचा खूप प्रभाव होता. नारायण सुर्वे यांनी कामगार, दलित, कंगाल पिडीतांच्या व्यथांना शब्दरूप दिले. सुर्व्यांच्या कवितेत थेटपणे भिडणारी वास्तवता आहे. त्याच्या कविता म्हणजे त्यांचे जळजळीत अनुभव आहेत.
त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार १९७३ साली मिळाला. तर १९९८ साली *पद्मश्री* पुरस्कार मिळाला, मध्यप्रदेशचा कबीर सन्मान १९९९ मध्ये मिळाला. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
नारायण सुर्वे याना केशवसुतांनंतरचे कवि म्हटले जाते.
नारायण सुर्वे याचे १६ ऑगस्ट २०१० साली ठाण्यात एका खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply