एका धार्मिक यहुदी परिवारात ती लहानाची मोठी झाली. मात्र केवळ यहुदी असल्यामुळे तिला बरेच काही भोगावे लागले. याचेच अनुभव तिने आपल्या कवितेत मांडले आणि तिच्या उत्कृष्ट कवितांना १९६६ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. सॅम्युअल जोसेफ अग्नान हे आणखी एक लेखक तिच्याबरोबर नोबेल पुरस्काराचे सहविजेते होते. या कवयित्रीचे नाव होते नेली जाक्स.
१० डिसेंबर १८९१ रोजी बर्लिनमध्ये तिचा जन्म झाला. तिचे वडील विल्यम जाक्स. जर्मनीतील एक प्रसिद्ध उद्योगपती होते. आईचे नाव मार्गारेट जाक्स. नेली जाक्स ही त्यांची स्कूलती एक मुलगी असल्यामुळे तिचे बालपण सुखात गेले. नेलीला लहानपणापासून संगीत, मृत्य, साहित्य याची आवड होती. नर्तिका होण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र मोठेपणी झाली ती एक प्रसिद्ध कवयित्री. नेली १५ वर्षांची असताना तिने नोबेल पुरस्कार विजेत्या सेल्मा लागरलोफ यांची गोस्टा बर्लिन ही कादंबरी वाचली. ती वाचून ती इतकी प्रभावित झाली, की तिने लागरलोफला एक पत्र लिहिले.
त्याचे तिला लगेच उत्तर आले. पुढे ३५ वर्षे तिचा व लागरलोफचा पत्रव्यवहार चाल होता. वयाच्या १८ वर्षांपासून तिने कविता लिहिण्यास प्रारंभ केला. त्याचवर्षी ती एका युवकाच्या प्रेमात पडली. मात्र दुकाने नाझी युद्धात तो मारला गेला. त्याचा तिला खूप धक्का बसला. जर्मनीचा सत्ताधीश असलेल्या हिटलरने घट्टीविरुद्ध अत्याचार सुरू केले. त्यामुळे नेली जाक्स ही लागरलोफच्या मदतीने आपल्या आईबरोबर स्वीडनला गेली. तेथे तिला खूपच हलाखीचे दिवस काढावे लागले. स्वीडनचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर तिने आपल्या कवितांमधून नाझींच्या अत्याचाराचे विदारक चित्र उभे केले. अशा कवितांचा ‘इन द हेवी टेन्शन्स ऑफ डेथ’ हा संग्रह प्रसिद्ध झाला.
त्यानंतर ‘व्हॅकआऊट द स्टार्स’ व ‘एक नो वन नोज हाऊ टू गो ऑन’ आदी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर तिने एक नाटकही लिहिले. त्यामध्येही नाझींच्या अत्याचारांवर प्रकाश टाकण्यात आला होता. यहुदीवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठविणाऱ्या तिच्या या साहित्याबद्दलच तिला नोबेल पुरस्कार मिळाला. अविवाहित राहिलेली नेली जाक्स हिचे दीर्घ आजारानंतर स्टॉकहोम येथे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.
Leave a Reply