माझ्या तोंडावर अचानक कोणीतरी जोरात पाण्याचा फसका मारल्यामुळे मी गाढ झोपेतून जागा झालो डोळे उगडून पाहतो तर काय एका जुन्या लकडी खुर्चीला माझे हात – पाय कात्याच्या रस्सीने करकचून बांधलेले होते माझे तोंड उगडेच होते पण बोलणार काय आजूबाजूला फक्त अंधार होता अंधारात पुसटसा प्रकाश कोठूनसा येत होता त्या प्रकाशात समोरच्या तीन भिंतींवर काही सुंदर पण अस्पष्ट स्त्रियांचे छायाचित्रे दिसत होती त्या छायाचित्रातील स्त्रिया माझ्याकडे पाहून हसत होत्या त्याचा वेगवेगळा हसण्याचा आवाज मधून – मधून माझ्या कानावर पडत होता तो आवाज ऐकून माझे कान बधिर झाले आणि मी जोरात किंकाळलो पण माझ्या किंकाळण्याचा आवाज मलाच ऐकू येत नव्हता. आता मात्र मी घाबरून घामागूम झालो माझे सर्वांग घामाने भिजून ओलेचिंब झाले तेव्हा मी खाली नजर करून पाहतो तर काय मी उगडा होतो माझ्या उगड्या अंगावर मला वाचता येतील अशी वेडीवाकडी बरीच मुलींची नावे लिहलेली होती त्यातील काही नावे ओळखीची वाटत होती. क्षणभर मला वाटले कोणीतरी माझे अपहरण केले आहे, पण दुसऱ्याचं क्षणी माझ्या मनात विचार आला माझ्यासारख्या भिके कंगाल माणसाचे कोणी अपहरण का करेल ? आणि अपहरण केले तरी तो माझ्यासोबत हा असा विचित्र का वागेल ? ही सारी भूतचेष्ठा म्हणावी तर भुते हे असे उद्योग करीत नाहीत बहुदा ! त्या खोलीचा अंदाज घेता मला ती खोली आमच्या वीस वर्षापूर्वीच्या घरासारखी वाटत होती आता त्या फोटोतील स्त्रियांच्या हसण्याचा आवाज शांत झाला होता म्हणून मी भीत भीत भिंतीकडे पाहिले तर भिंतीवर ती स्त्रियांची छायाचित्रेच नव्हती त्याजागी काहीं गुलाबी कागद चिकटविलेले होते ज्यावर मुलींची नावे रक्ताने लिहलेली होती. तो प्रत्येक कागद गुलाबासह गुलाब खिळा असल्यासारखा भिंतीवर लटकलेला होता माझ्यापासून थोड्या अंतरावर मला एक पांढरा कागद फडफडताना दिसला त्या कागदावर एक विवस्त्र स्त्रीचे चित्र पेन्सिलीने रेखाटलेले होते अचानक त्या कागदाचे हवेत कोणीतरी कागद फडल्यासारखे बारीक बारीक तुकडे केले आणि ते तुकडे खाली फेकले आणि खाली पडलेले ते तुकडे अचानक एकत्र गोळा होऊन माझ्या चेहऱ्यावर फेकून मारले गेले त्यातील काही तुकड्यांवर माझी नजर पडताच माझ्या लक्षात आले हे चित्र आपणच रेखाटले होते आपण सातवीत असताना उत्सुकते पोठी ! नंतर ते फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकले होते आणि त्या चित्राचे काही तुकडे घेऊन यामिनी तुझ्याकडे आली होती आणि तिने तुला विचारले होते हे चित्र तू काढले होतेस का ? तेव्हा मूर्खा तू नाही म्हणाला होतास हो ! म्हणाला असतास तर आज ती तुझ्या सोबत असती पण नाही तुला तुझा सभ्यपणाचा मुखवटा कधीच उतरवता आला नाही म्हणून आज चाळिशीतही एकटाच आहेस आणि एखादया शापित राजकुमाराचे एक राजवाड्यातील शापित बंधीस्थ जीवन जगत आहेस वेड्यासारखे ! मी हा विचार करीतच होतो इतक्यात माझ्या पाठीमागून दोन हात अचानक पुढे आले त्या नाजूक हातावर छान मेहंदी काढलेली होती मेहंदी ओली होती दुसऱ्याच क्षणाला ते हात माझ्या गालावर गेले आणि त्या हाताची मेहंदी माझ्या गालाला लागली मला काही कळायच्या आत ते हात अदृश्य झालेले होते मी किंचित मन वळवली तर माझ्या चेहऱ्यासमोर एक आरसा होता पण त्या आरशात मला माझाच चेहरा पण वीस वर्षापूर्वीचा दिसत होता आणि तो चेहरा हळू हळू बदलत विद्रुप होत होता माझा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाल्यावर त्या आरशाला हवेतच तडे जाऊन त्याचे तुकडे जमिनीवर पडले त्या तुकड्यात मला काही सुंदर तरुणींचे फुसटसे चेहरे दिसत होते जे माझ्याकडे पाहून क्रूरपणे हसत होत्या त्याचे हसणे असह्य होऊन मी डोळे बंद करून पुन्हा उगडले तर सारे पूर्वीसारखेच शांत ! इतक्यात कोणीतरी दरवाज्याशी खेळतोय असे वाटले किंचित दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद झाला आत कोणी आल्याचे अथवा गेल्याचे दिसले नाही पण कोणीतरी अचानक माझ्या तोंडात माझ्या आवडीचे चॉकलेट कोंबल्याचे माझ्या लक्षात आले आणि मला प्रश्न पडला हे हे काही होत आहे ते कोणी का करीत असेना त्याला माझ्या आवडीचे चॉकलेट कसे काय माहीत आहे ? आता मात्र माझ्या भीतीची जागा रागाने घ्यायला सुरुवात केली होती गेली कित्येक वर्षे माझ्यात साचून दाबून राहिलेला क्रोधाग्नी जागा होऊ लागला माझे डोळे रागाने लाल झाले माझ्या चेहऱ्यातून वाफा येऊ लागल्या त्या रागात मी म्हणालो तू जो कोणी अथवा जी कोणी आहेस हिंमत असेल तर समोर ये ! मी असे म्हणताच एक काळ्या बुरख्यातील स्त्री प्रकट झाली मला फक्त तिचे डोळे दिसत होते त्या डोळ्यांकडे पाहून मला लक्षात आले की हि अतिशय सुंदर आहे पण हे डोळे आपण यापूर्वीही पाहिलेत ! म्हणून मी तिला प्रश्न केला कोण आहेस तू ? त्यावर ती जोरात हसत माझ्या पाठीमागे गेली माझ्या खांद्यावर हळूच हात ठेवला तिच्या हातावर फणा असलेल्या नागाचे चित्र कोरलेले होते जे बहुदा मी माझ्या हातावर कोरत असतो ती हळूच माझ्या जवळ येत माझ्या कानात पुटपुटली मी तुझी कविता ! माझ्या माहितीप्रमाणे मी कोणा कविता नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलो नव्हतो त्यामुळे मी कोण कविता ? असा प्रश्न करताच ती पुन्हा माझ्या कानाजवळ आपले ओठ आणत पुटपुटली जिच्यासाठी तू कित्येकींना सोडलेस ती मी तुझी कविता ! मी तुझ्या हृदयात, मनात , बुद्धीत आणि डोळ्यात राहते ! जिच्यासाठी तू खून केलास ? त्यावर मी खून कोणाचा ? असा प्रश्न करताच ती म्हणाली, तुझ्यातील चित्रकाराचा किती सुंदर चित्र काढायचा तो त्याच्या त्या चित्रात यामिनी कामिनी आणि दामिनी हरवून जायच्या यामिनी तुझे ते चित्र आठवून आजही स्वतःशीच हसते तिला माहित होत ते चित्र तूच काढलं होतस तू तिच्याशी खोटं बोललास पण तिला तुझ्यातील खोटारडा नाही साधू दिसला, कामिनीला आजही कोणतेही कोणीही रेखाटलेले चित्र पाहिले की तीला तुझी आठवण येते कारण तिचे फक्त तुझ्यातील चित्रकारावर प्रेम होते आजही आहे दामिनी आजही आपल्या तळहाताकडे पाहते तेव्हा तू तिचा नाजूक हात हातात घेऊन तिच्या हातावर काढलेली मेहंदी तिला आठवते आणि तिचे अश्रू तिच्या तळहातावर आजही गळतात टप-टप ! तू माझ्या प्रेमात पडलास कारण तू भक्तीच्या प्रेमात वेडा झाला होतास तिच्यासाठी तुला हवी होती प्रसिद्धी ती तू मिळविलीस पण कित्येकांचे हृदय पायाखाली तुडवून ! भक्तीला तुझ्या प्रसिद्धीच काहीच पडलेले नव्हते अरे ती तर तुझ्या दिसण्याच्या प्रेमात पडली होती शेवटी काय झालं ? तुझ्या प्रसिद्धीलाच घाबरून ती तुझ्यापासून दूर गेली ना ? आठव किती मोहाचे क्षण आणि त्या मोहातून तुला मिळाला असता असा संभाव्य आनंद तू गमावला आहेस ? त्यावर मी रागाने म्हणालो, तू केलेले सर्व आरोप खोटे आहेत कोणतीच तरुणी कधीच मला म्हणाली नाही की माझे तुझ्यावर प्रेम आहे ! म्हणाली असती तर मी कदाचित तिच्या प्रेमाचा स्वीकार केला असता ! त्यावर कविता रागात कदाचित का ? त्यावर मी म्हणालो , त्या प्रत्येकीजवळ मी माझे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न स्वतःहून केला होता पण नियतीने प्रत्येक वेळी माझा तो प्रयत्न हणून पाडला रोज माझ्या आयुष्यात कोणीतरी नवीन यायची तिचे सौंदर्य पाहून माझ्यातला कवी जागा व्हायचा तिच्या प्रेमात पडायचा क्षणभर आणि एक कविता लिहायला चा पुढे हे सवयीचे झाले भराभर वर्षे निघून गेली आणि अचानक माझा सुंदर चेहरा कुरूप झाला तेव्हा मला जाणीव झाली मी शापित असल्याची आता माझ्याजवळ सारे काही होते तू होतीस प्रसिद्धी होती संपत्ती होती पण माझी प्रेरणा होणारी ती शोधूनही सापडत नव्हती, माझ्यातील चित्रकाराचा मी खून केला आता तुझाही करतो इतके म्हणून मी माझ्यातील सर्व ताकत एकवटून माझी त्या रस्सीच्या बंधनातून सुटका होताच मी माझे दोन्ही हात कवितेच्या गळ्याभोवती आवळले आणि मला काही कळायच्या आत कविता अदृश्य झाली आता मी मोकळा होतो मी दरवाजाच्या दिशेने पाऊल टाकणार तोच माझ्याभोवती अचानक एक तुरुंग निर्माण झाला तुरुंगा बाहेर मला माझेच प्रतिबिंब माझ्यावरच जोर जोरात हसताना दिसत होते ते मला म्हणाले, तुझ्यातील ते चित्रकाराचा तू खून केलास असे तुला वाटते आज तू कवितेचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास उद्या कदाचित स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करशील हा तुरुंग तुला याची आठवण करून देण्यासाठी आहे गेल्या जन्मातील तुझी काही अपूर्ण कार्ये तुला या जन्मात तिच्या साथीने पूर्ण करायची आहेत तिचा जन्म झाला आहे फक्त तुझ्यासाठी त्यामुळे तिची पहिली नजर तुझ्यावर पडताच क्षणी तू दामीनीला गमावलेस, ती तुझ्या सानिध्यात येताच तू कामिनीला गमावलेस, ती तुझ्या प्रेमात पडताच तू यामिनीला गमावलेस आणखी कोणी तुझ्या प्रेमात पडू नये या तिच्या इच्छेमुळे तू तुझे सौंदर्य गमावलेस ! ती कोण आहे हे आता तुला कळेल कारण आता तू भविष्य ही जाणतोस ! हे ऐकून मी क्षणभर माझे डोळे बंद करताच पुन्हा उघडले तर मी माझ्या झोपायच्या खोलीत बिछान्यावर स्वच्छ प्रकाशात लोळत पडलो होतो इतक्यात दारावरची बेल वाजली मी उगडाच दाराजवळ गेलो दार उगडले दारात ती होती तिच्या डोळ्यात पाहिले डोळे कवितेसारखे होते ! मी भीत भीतीच तिला विचारले आपण कोण ? त्यावर ती गोड आवाजात मी कविता ! म्हणताच मला चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळलो ! जाग आली तेव्हा ती माझ्या समोर उभी होती आमच्या मागच्या जन्मातील अपूर्ण कामाची यादी हातात घेऊन…
लेखक – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, बी-विंग, जलधारा एस आर ए, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जनरल अ. कु. वैद्य मार्ग, गोरेगांव (पूर्व ), मुंबई – ६५.
मो. ८१६९२८२०५८, ८६९२९२३३१०
Leave a Reply